पुणे – बहुचर्चित पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील मेट्रोची चाचणी करण्यासाठी लागणारे मेट्रो संच (डबे) येत्या शनिवारी पुण्यात दाखल होणार आहेत. या प्रत्येक संचात तीन कोच असून एक कोच महिलांसाठी राखीव ठेवल्याची माहिती महामेट्रोने दिली.

शहरातील महामेट्रोच्या कामाने गती घेतली आहे. काही ठिकाणी मेट्रोचे रुळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी नागपूरहून निघालेले मेट्रो संच पुण्यात दाखल झाल्यानंतर चाचणी होणार आहे. मेट्रोच्या एका ट्रेनमध्ये 950 ते 970 प्रवासी क्षमता असणार आहे. संपूर्ण मेट्रो वातानुकूलित असून अत्याधुनिक सेवा पुरविली जाणार आहे. तसेच, मेट्रोचे संच एकमेकांना जोडलेले असल्याने प्रवाशांना सहजरित्या दुसऱ्या कोचमध्ये प्रवेश करता येणार आहे.

अधिक वाचा  कर्णधार म्हणून BCCI ने दिलेली मोठी ऑफर विराटने नाकारली

मेट्रोतील सुविधा
मेट्रोचे संच पूर्णतः स्टेनलेस स्टीलच्या धातूपासून बनविले आहेत. वजनाला हलके असलेल्या या संचामध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे असून बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेने आतील दिव्यांचा प्रकाश आपोआप कमी अधिक करण्याची यंत्रणा बसवली आहे. या ट्रेनचा वेग अधिकतम 90 कि.मी. असणार आहे. या ट्रेनमध्ये मोबाइल, लॅपटॉप चार्जिंग सुविधा असणार आहे.