पुणे शहरातील भारतीय जनता पक्ष म्हटलं की ज्या कोथरूडचं अभिमानाने नाव घेतलं जातं त्याच कोथरूडचा स्वाभिमान म्हणजे प्रभाग -13. आचार विचार आणि प्रचार फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष या नाण्याच्या दोन बाजू या भागातील नागरिकांसाठी जीवनाचा अविभाज्य अंग होण्यासाठी जे पडद्यामागे अविरत कष्ट उपसणारे हात म्हटलं की हमखास एक नाव घेतलं जातं ते म्हणजे अमोल विलास डांगे. हिंदू राष्ट्र आणि भारतमाता यांच्या अविरत सेवेसाठी कार्यरत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचीच विचारसरणी पुढे घेऊन जाणाऱ्या भारतीय जनता पक्षात चिटणीस पुणे शहर म्हणून काम करत असताना एरंडवणा भागातील घराघरांमध्ये पक्ष विचारांचं हे बीज पोहोचवण्याचं कार्य अमोल डांगे गेली 30 वर्षापासून अविरत करत आहे.
अमोल डांगे यांनी 1995 पासून ‘अभाविप’ च्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला ‘अर्पित’ आयुष्य जगण्यास सुरुवात केली. त्यानंतर कामाची पावती म्हणून पक्ष नेतृत्वाने कोथरूड विधानसभा मतदारसंघात 2 वेळा सरचिटणीस व नंतर चिटणीस पुणे शहर अशी जबाबदारी दिली. आपल्या एरंडवणा परिसराचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी कोणत्याही पक्ष धोरणाला विरोध न करता पक्षाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला यशस्वी करण्यासाठी कष्ट उपसले असले तरी सुद्धा या नेतृत्वाला योग्य संधी मिळण्याची आजही अपेक्षा आहे. आजपर्यंत देशभर शहरभर नेतृत्व करणाऱ्या नेत्यांसाठी या पडद्यामागील कार्यकर्त्यांने अविरत काम केले. गेली ३० वर्षं ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करणाऱ्या ….फक्त एका संधीची अपेक्षा आहे!. नव्या पिढीच्या विनम्र ‘संघीय स्वयंसेवी’ कार्यकर्त्यास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
पुणे महापालिकेचा प्रभाग 13 (एरंडवणे-नवसह्याद्री) भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात असला तरी सुद्धा पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी दिल्ली ते गल्ली आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केले त्यांच्या हक्काचं नाव म्हटलं की अमोल डांगे आणि त्याचा चमू!. एरंडवणे भागामध्ये पुणे शहरात 1962 साली पानशेत धरण फुटी झाल्यानंतर शासनाच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांसाठी ‘पूरग्रस्त’ ओट्यांचे वाटप करण्यात आले. उच्च व शिक्षित लोकांचा रहिवास असणाऱ्या या भागात स्थलांतर झाल्यानंतर वस्ती विभागातील लोकांच्या प्रगतीसाठी आणि आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित) करण्यासाठी अमोल डांगे यांनी महाविद्यालयीन काळापासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामाचा 1995 मध्ये शुभारंभ केला. महाविद्यालयीन काळामध्येच व्यक्तिमत्त्वांमध्ये असलेले नेतृत्वाचे गुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितार्थ अविरत काम करत राहण्याची भूमिका ओळखत अगोदर पुणे शहर सह- मंत्री अभाविपची जबाबदारी देण्यात आली आणि लागलीच केलेल्या कामाची पावती म्हणून अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश कार्यकारणीत सदस्य म्हणून सन 2000पर्यंत निवड करण्यात आली.
एरंडवणे परिसरात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असंख्य कार्यकर्ते असतानाही परिसरात स्थलांतरित व्यक्तींपर्यंत संघकार्य आणि विचार पोहचण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून महिला व विद्यार्थ्यांचा विकास साध्य करण्यासाठी ‘सेतू फाउंडेशन’ची स्थापना केली. एरंडवणे परिसरातील गरजवंत विद्यार्थी आणि महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज काम करणारी एकमेव संस्था म्हणून अमोल डांगे यांच्या ‘सेतू फाउंडेशन’चेच नाव घ्यावे लागते. एरंडवणे- नव सह्याद्री परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय संख्या असल्याने या लोकांच्या नित्य समस्या सोडवण्यासाठी (वैद्यकीय आणि दैनंदिन सेवासुविधा) आवश्यक असलेल्या मनुष्यबळांसाठी ‘सेतू फाउंडेशन’च्या माध्यमातून कार्य केले जात असल्याने संपूर्ण प्रभागातील लहान मोठ्या घरांमध्ये अमोल विलास डांगे हे नाव अलगदपणे आणि आपुलकीने घेतले जाते. कोणत्याही प्रकारचा दंभ, अहंकार नाही किंवा नेतृत्वाच्या नावाची फुशारकी न करता महाविद्यालयीन धडे घेतल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक (ज्याच्या आचार विचारात फक्त आणि फक्त राष्ट्रहीत) म्हणून गरजवंतांच्या मदतीला धावणारा सेतू म्हणूनच या ‘स्वयंसेवी’ कार्यकर्त्याचे नाव घेतले जाते.
पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक झटपट विकसित होणारे शहर म्हणून कोथरूडचं नाव घेतलं जात; परंतु हा झटपट होणारा विकाससुद्धा स्मार्टच व्हावा, मूलभूत पायाभूत सोयी सुविधा, ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांना सुखकर पादचारी मार्ग यासारख्या मूलभूत बदलही या बदलत्या भागामध्ये व्हावे यासाठी ‘स्मार्ट कोथरूड’ या संस्थेची निर्मिती अमोल डांगे यांनी केली आहे. सार्वजनिक रस्त्यावर अनाधिकृत व्यवसाय नसावे, इमारतींच्या आजूबाजूला परिसर स्वच्छ राहवा, स्थानिक नागरिकांना पदपथ आणि चौक सुटसुटीत मिळावे यासाठी कायमच आग्रह धरत स्मार्ट कोथरूडच्या माध्यमातून एरंडवणा परिसरातील सर्व रस्ते व चौक अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी आजही ‘स्मार्ट कोथरूड’ ही संस्था काम करत आहे. एरंडवणा परिसरातील दिनानाथ हॉस्पिटल, नळस्टॉप चौक, भैरवनाथ मंदिर चौक, गणेश नगर वोटा वसाहत, एसएनडीटी महाविद्यालय या प्रमुख चौकात पायाभूत सोयी सुविधा मिळवण्यासाठी ‘स्मार्ट कोथरूड’च्या माध्यमातून कायम पाठपुरावा करण्याचे काम केले आहे.
एरंडवणा परिसर म्हटलं की राजाराम पूल ते म्हात्रे पूल 100 फुटी डीपी रस्ता हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! सकाळी आणि संध्याकाळी या परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तरुण व्यायामासाठी या परिसरात वापर करतात स्मार्ट पुण्याच्या अंतर्गत या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम केल्याने या परिसराचा काया-पालट झाला; परंतु हा काया-पालट होतानाही या भागात नित्य फेरफटका मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करण्यात यावा अशी भूमिका घेण्यात आली. या रस्त्यालगत असलेले पदपथ आणि त्या पदपथावर बसवलेले व्यायामाचे साहित्य या सर्वांचा पाठपुरावा करत परिसरातील नागरिकांना निरोगी राखण्यासाठी अत्यावश्यक व्यायाम प्रकारांचे साहित्य पुणे महापालिकेच्या माध्यमातून लावण्यासाठीही ‘स्मार्ट कोथरूड’च्या वतीने विशेष लक्ष देण्यात आले आहे. परिसराचा विकास होत असताना या छोट्या परंतु अत्यावश्यक गोष्टींसाठी आग्रह धरल्यामुळे सर्वात सुरेख पदपथ एरंडवणे भागातच पाहण्यास मिळत आहे. आजमितीला पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून याच भागात नागरिक चालण्यास प्राधान्य देतात.