बँकेच्या प्रकरणात थेट भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. खासदार कुलकर्णी यांनी ठेवीदारांची बाजू घेतल्याने काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमकी दिली.”मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणात पडू नये नाहीतर त्यांची व्यवस्था करू.. मागे त्यांच तिकीट कापलं होतं हे त्यांना माहिती आहे.” अशा पद्धतीची धमकी यशवंत सहकारी बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.

कराड येथील यशवंत बँकेच्या 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मेधा कुलकर्णी या सातत्याने आवाज उठवत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन ठेवीदारांची बाजू मांडली होती. यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी यशवंत बँकेकडून जवळपास 120 हून अधिक जणांची 140 कोटी रुपयांची फसणूक केल्याचा आरोप ठेवीदारांचा आहे आणि ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी या ठेवेदारांच्या बाजूने लढत आहेत.

अधिक वाचा  जुबिन नौटियालची बेवफाईवरील पाच सुपरहिट गाणी, ज्यांना मिळाले खूप व्ह्यूज

यापूर्वीही मेधा कुलकर्णी यांनी सहकार आयुक्तांकडे याचा पाठपुरावा केला होता. मात्र अद्यापही यामध्ये प्रशासन आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये. त्यामुळे लवकरच अमित शाह यांना भेटून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. 120 ठेवीदारांची फसवणूक केल्यानंतरही तसेच आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतरही यशवंत बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, त्यांना कोण वाचवत आहे? असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.