नवी दिल्ली: पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये जम्मूमधील विमानतळ टार्गेट करण्यात आलं, परंतु भारताने हा हल्ला परतवला आहे. भारताच्या S-400 ने आतापर्यंत 8 पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाइल निकामी केली आहेत. तसेच  पाकिस्तानचे F-16 जेटही पाडण्यात यश मिळवलंय. एकीकडे मिसाइल हल्ला सुरू असतानाच पाकिस्तानने सांबा येथे गोळीबारही सुरू केला.

पाकिस्तानने पुन्हा केला भारतावर हल्ला

पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर जम्मूतील आरएस पुरा भागात ब्लॅकआउट  करण्यात आला. तसंच हवाई हल्ल्याचा धोका सूचित करणारा सायरन सातत्याने वाजवला जात आहे. जेणेकरून येथील नागरिक हे सुरक्षित स्थळी पोहचू शकतील.

अधिक वाचा  काळेपडळमध्ये ब्लॅकमेलिंग व अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न करणारा गुन्हेगार जावेद नबी अटकेत

सध्या जम्मू शहरात मोबाइल नेटवर्क देखील ठप्प झालं आहे. दुसरीकडे, कुपवाडामध्येही जोरदार गोळीबार झाला आहे. तंगधारमध्येही पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात तोफगोळे डागण्यात येत आहे. त्याच वेळी, पूंछ आणि राजौरीमध्येही जोरदार गोळीबार सुरू आहे.

भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक महत्त्वाच्या ठिकाणांजवळ जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली बसविण्यात आली आहे. हीच प्रणाली आता पाकिस्तानी हल्ल्यांना प्रत्युत्तर देत तेच हल्ले परतवून लावत आहे. ही प्रणाली जम्मू विमानतळाजवळ, पठाणकोटजवळ, अखनूर सेक्टर आणि सांबा परिसरात तैनात करण्यात आली आहे. तर जम्मू विमानतळावरून लढाऊ विमानं ही सातत्याने उड्डाण करत आहेत.

अधिक वाचा  वाघोली पोलिस ठाणं – छताशिवाय प्रशासन! खुल्या आकाशाखाली काम करत आहेत अधिकारी, मूलभूत सुविधा नाहीत

दुसरीकडे पाकिस्तानने राजस्थानमधील जैसलमेरवरही हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं समजतं आहे. कारण येथे काही स्फोटाचे आवाज देखील ऐकू आले आहेत. यामुळे जैसलमेरमध्येही ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे.

पाकिस्तानकडून भारतात कुठे हल्ला, कुठे ब्लॅकआऊट? संपूर्ण यादी

उधमपूर (ड्रोन हल्ला)

जम्मू (ड्रोन हल्ला)

अखनूर (ड्रोन हल्ला)

पठाणकोट (ड्रोन हल्ला)

अमृतसर (ड्रोन हल्ला)

कुपवाड (ड्रोन हल्ला)

कठुआ (ड्रोन हल्ला)

सांबा सेक्टर (गोळीबार आणि ड्रोन हल्ला)

तंगधार (जोरदार गोळीबार)

गुलमर्ग (ड्रोन हल्ला)

राजौरी (LOC जवळ हल्ला)

पूँछ (जोरदार तोफगोळ्यांचा हल्ला)

आर पुरा (ड्रोन हल्ला)

अर्णिया (ड्रोन हल्ला)

अधिक वाचा  पुण्यात अवघ्या १० तासांत ३४ झाडे कोसळली; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

बारामुल्ला (ब्लॅकआऊट)

उरी (ब्लॅकआऊट)

फिरोजपूर (गोळीबार, ब्लॅकआऊट)

जैसलमेर (तोफगोळ्यांचा हल्ला)

जालंधर (ड्रोन हल्ला)

चंदीगड (सायरन वाजण्यास सुरुवात, ब्लॅकआऊट)

कच्छ (ब्लॅक आऊट)

मोहाली (ब्लॅक आऊट)

श्रीनगर (ब्लॅक आऊट)

धरमशाला (मैदानात ब्लॅक आऊट, IPL मॅच थांबवली)

पोखरण (पाकिस्तानचं फायटर पाडलं)