गुणवंत कामगार कल्याण मंडळ, पुणे शहर संस्थेच्यावतीने शिवाजीनगर येथील श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या कामगारांचे प्रतीक असणाऱ्या कामगार पुतळ्यास  १ मे रोजी पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ गुणवंत कामगार भाई ताम्हणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पस्तीस वर्षापासून सातत्याने कामगार पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी पुणे शहरातील अनेक कारखान्यातील कामगार या ठिकाणी हजर असतात ही परंपरा तरुण पिढीने सातत्याने चालू ठेवून कामगारांनी  सांघिक भावना वाढीस लागण्याकरिता सातत्याने कार्यरत असायला हवे. अशा प्रकारचे विचार भाई ताम्हाणे यांनी मांडले.

अधिक वाचा  मुंढर गावी कृषीदिनानिमित्त चारसूत्री भातशेती लागवड प्रात्यक्षिक व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कामगार भूषण राजेंद्र वाघ यांनीही कमिन्स इंडियातील कामगारांच्या आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्यावतीने  शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गुणवंत कामगार संपत खैरे, संजय गोळे, सदाशिव एकसंबे, रविंद्र रायकर, सोमनाथ वाले, महंमदशरीफ मुलाणी(शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड), रविंद्र चव्हाण, कैलास नेवसे, श्रीकांत दोडतल्ले, महानगरपालिकाचे आरोग्य निरीक्षक राहुल शेळके, वैजीनाथ गायकवाड आणि बहुसंख्य कर्मचारीवर्ग उपस्थित होता. गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव संजय गोळे यांनी आभार मानले.