जागतिक बाजारात प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारही वाईट टप्प्यातून जात आहे. जगात व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. यामुळे देशातील आणि जगातील बाजारपेठेत भूकंप झाला आहे. दरम्यान, रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी आणखी एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटले आहे की शेअर बाजाराचा फुगा फुटत आहे आणि इतिहासातील सर्वात मोठी मंदी येणार आहे.

1929चा विक्रमही मोडणार!

कियोसाकीने इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणीचा इशारा दिला असून यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी मंगळवारी त्यांच्या X खात्यावर एक पोस्ट शेअर करताना सांगितले की, जागतिक बाजारपेठांमध्ये प्रचंड गोंधळ आहे.

अधिक वाचा  राज्याचे ‘कर्ज झाले तिप्पट महसुली तूटही दुप्पट…..’; ‘स्थानिक’च्या निवडणुका या निधीत 11 % वाढ तर लाडकी बहीण निधी एवढ्या कोटींनी कमी

यामुळे इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक मंदी येऊ शकते. युनायटेड स्टेट्स, जर्मनी आणि जपानमधील आर्थिक संकटांमुळे ही मंदी 1929 च्या शेअर बाजारातील घसरणीपेक्षा भयंकर असू शकते अशी भीती आहे.