बीड : सध्या बीडमधील मारहाणीचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामुळे खळबळ निर्माण झालीये. संतोष देशमुख यांच्या हत्येदरम्यानचे काही फोटो व्हायरल झाली. ज्यानंतर बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडीओ पुढे येत आहेत. टोळक्यांकडून एकाच मुलाला मारहाण केली जातंय. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू याचा सुरूवातीला एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आला. या व्हिडीओमध्ये दादा खिंडकर एका मुलाला क्रूरपणे मारहाण करताना दिसला.

दादा खिंडकरचे दोन धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

दादा खिंडकरसोबतच अजून काहीजण त्या मुलाला पट्टाने, पाईपने आणि काठ्यांनी शेतात मारहाण करताना दिसले. तो मुलगा जोरजोरात ओरडताना देखील व्हिडीओमध्ये दिसत स्पष्ट दिसत होता. दादा खिंडकर याच्याकडून आणि त्याच्या टोळीकडून तरीही मारहाण सुरूच ठेवण्यात आली. संतोष देशमुखांच्या न्यायासाठी काही दिवसांपासून दादा खिंडकर लढताना दिसत होता. मात्र, दुसरीकडे तेच क्रूरपणे मारहाण करताना दिसतोय.

अधिक वाचा  स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठं ट्विस्ट; पीडित तरुणीच्या पदरी निराशाच का? पुणे पोलिसांकडून देण्यात आला नव्या मागणीला नकार 

दादा खिंडकरने स्पष्ट केले की, व्हायरल होणारा व्हिडीओ जुना आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर बीड पोलिस अॅक्शन मोडवर आले. दादा खिंडकर विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आता दादा खिंडकर पोलिसांना शरण आलाय. फक्त एकच नाही तर दादा खिंडकरचे दोन व्हिडीओ व्हायरल झाली. दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका घरावर हल्ला करताना दादा खिंडकर दिसला. आता एसपी ऑफिसमध्ये दादा खिंडकरने आत्मसमर्पण केले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा खिंडकरचे आत्मसमर्पण

मारहाण आणि घरावर हल्ला केल्याप्रकरणी बीड पोलिस ठाण्यात दादा खिंडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. दादा खिंडकरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर याबद्दल धनंजय देशमुख यांनी अजून काही प्रतिक्रिया दिली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा खिंडकर याने प्रतिक्रिया दिली होती आणि जुना व्हिडीओ अजून तो मुद्दाम व्हायरल करण्यात आला. ते प्रकरण आम्ही त्यावेळीच मिटवले होते, असे दादा खिंडकरने म्हटले होते.

अधिक वाचा  PM नरेंद्र मोदी मॉरिशसच्या भेटीवर, 1998 रोजीच्या दौर्‍याची का होतेय चर्चा, पंतप्रधानांनी जागवल्या खास आठवणी