आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असणारे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार कराड दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या कोयना बँकेत पोहचले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या या दौऱ्यात ते काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून उदयसिंह पाटील उंडाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर सध्या काँग्रेसमध्ये आहे. त्यांच्यावर काँग्रेसने सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. परंतु आता ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सह्याद्रीवर गेस्ट हाऊसवर अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरु झाली होती. आता या चर्चांना अजित पवार यांच्या बुधवारच्या दौऱ्यात दुजोरा मिळू शकतो.
‘चाय पे चर्चे’त ठरणार तारीख
अजित पवार बुधवारी सकाळी राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या कोयना बँकेत चहापान व नाश्त्यासाठी पोहोचले आहे. या ठिकाणी उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरण्याची शक्यता आहे. म्हणजेच ‘चाय पे चर्चे’त उदयसिंह पाटील यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे.
लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार…
स्व. विलासराव पाटील यांनी कधीकाळी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व केले होते. परंतु उदयसिंह पाटील यांना वडीलांची कामगिरी करता आली नाही. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तसेच राज्यात महाविकास आघाडी पराभूत झाली आहे. यामुळे त्यांचे कार्यकर्ते पक्षात अस्वस्थ आहेत. त्याऐवजी आता राष्ट्रवादीत प्रवेश करुन सत्तेसोबत राहावे, असे उदयसिंह पाटील यांनी ठरवल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांची त्यांचा पक्ष यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणार असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे उदसिंह पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे म्हटले जात आहे.