बीड:  मस्सोजाग गावचे सरपंचसंतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरलंय. या हत्येप्रकरणी आज केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली. आता याप्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. हत्येप्रकरणी सीआयडीचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरची ही महत्वाची सुनावणी पार पडली. सरकारी वकीलांकडून 26 तारखेपर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली. 15 दिवसानंतर पुन्हा ही सुनावणी होणार आहे. यावेळी या प्रकरणातील वाल्मिक कराडसह सर्व आरोपी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते. सुनावणीच्या वेळी वाल्मिक कराडने हात जोडून उभा होता.

आरोपपत्रात पू्र्ण कागदपत्र दिले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. आरोपींचा जबाब दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींचे जबाब हे बंद लिफाफ्यात आहेत. तो लिफाफा उघडून आरोपींना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. त्याशिवाय, या प्रकरणातील डिजीटल पुरावे, व्हिडीओ, सीडीआर, ऑडिओ कॉल याची मागणी करण्यात आली.

अधिक वाचा  देशातील पहिलाच उसाचा ‘एआय’ प्रयोग यशस्वी एकरी १०४ ते १५० टनांपर्यंत उत्पादन वाढ; खर्च अन् पाण्यातही सुमारे ३० टक्क्यांची बचत

कोर्टाचा प्रश्न आणि वाल्मिकचे उत्तर

दरम्यान या प्रकरणी सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उभे होते. ओळख परेडसाठी सर्वं आरोपीना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायाल्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी या हत्या प्रकरणातील मास्टरमईंड वाल्मिक कराड हा हात जोडून उभा होता. यावेळी कोर्टाने आरोपपत्र मिळाले का, वकिल देण्यात आला का, याची विचारणा केली. त्यावर आरोपींनी हो असे उत्तर दिले.

कागदपत्राची पूर्तता करण्याचे आदेश

सरकारी वकिलांनी 26 मार्चपर्यंत मुदत देण्याची मागणी केली. खंडणी प्रकरणतील आरोपी ज्ञानेश्वर मुळे संदर्भांत काही आक्षेप असेल तर कोर्टात लेखी म्हणणे सादर करा अशी सूचना कोर्टाने केली. आरोपीच्या वकिलांनी कोर्टातअर्जाद्वारे सरकारी पक्षाच्या वकिलांकडून कागदपत्रांची मागणी केली. न्यायाधीशांनी तो अर्ज सरकारी वकिलांकडे देत कागदपत्राची पूर्तता करण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा  अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मंत्री आदिती तटकरेंकडून महत्त्वाची घोषणा

खटला फास्ट ट्रॅक मध्येच चालेल : धनंजय देशमुख

दरम्यान हा खटला फास्ट ट्रॅक मध्येच चालेल आणि या खटल्याच्या शेवटी मला जजच्या तोंडून या सर्व आरोपींना फाशी दिली जाणार आहे हेच ऐकायचं आहे असं मत धनंजय देशमुखांनी व्यक्त केलं.