काल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट, अंतरंगी डिजायनर्स आणि पुणे अर्बन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कर्वेनगर – वारजे परिसरातील भगिनींसाठी मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्कचे मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुलच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात अनेक भगिनींनी उपस्थिती दर्शवत हा उपक्रम यशस्वी केला.
तब्ब्ल ४०० हून अधिक माता भगिनींनी आपल्या नावाची नोंदणी केली असून आरी वर्कचे प्रशिक्षण देणारे श्री. अभयजी भोसले यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवत येत्या तीस दिवसांत उत्तमोत्तम प्रशिक्षण देण्याचा शब्द दिला आहे. यावेळी १२० महिलांच्या चार बॅच तयार करण्यात आल्या असून त्याप्रत्येक बॅचमधुन ३० महिलांचा स्वतंत्र ग्रुप करण्यात आला आहे. प्रत्येक महिला भगिनीला उत्तम प्रशिक्षण मिळण्यासाठी कमी संख्येच्या बॅच तयार केल्या असून येत्या महिनाभरात या भगिनी लवकरच ही कला शिकून घेतील, यात शंकाच नाही.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटीका मातोश्री सौ. लक्ष्मीताई दुधाने, प्रशिक्षक श्री. अभयजी भोसले, श्री. योगेश माकणे सपत्नीक तर खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा मीनल ताई धनवटे, प्रभाग अध्यक्ष किशोर शेडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माझे सर्व सहकारी, ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, अंतरंगी डिजायनर्स, पुणे अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने माता भगिनी याप्रसंगी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अयोजन स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाने यानी केले होते.