विक्की कौशल- रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. रुपेरी पडद्यावर आपल्या राजाची शौर्यगाथा पाहून चाहते पुरते भारावून गेले आहेत. अशातच आता गुजरातच्या भरूचमधून एक बातमी समोर येत आहे. ‘छावा’ सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये छत्रपती शंभू राजांवर मुघल बादशाह औरंगजेबानं केलेले अत्याचार पाहून एक प्रेक्षक नाराज झाला. त्यानं मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही आणि थेट थिएटरची स्क्रिन फाडायला सुरुवात केली. संतापलेल्या प्रेक्षकानं सिनेमा सुरू असतानाच स्क्रिन फाडायला सुरुवात केली.

संतापलेल्या एकानं तोडली थिएटरची स्क्रिन 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर मुघलांनी केलेले अत्याचार भरूचमधील प्रेक्षक जयेश वसावा सहन करू शकला नाही. रागाच्या भरात त्यानं स्क्रीन तोडली. मराठा-मुघल संघर्षावर आधारित या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीन दरम्यान भरूचमधील एका चित्रपटगृहात ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी गुजरात पोलिसांनी आरोपी जयेश वसावाला अटक केली आहे.

अधिक वाचा  आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत ‘इंडिया’च्या खेळाडूंची छाप वरुण चक्रवर्तीचा धमाका 16 स्थानांची उडी घेत या क्रमांकावर विराजमान