राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. आजच्या बैठकीत 6 मोठे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये, सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या एनटीएफ फोर्समध्ये 346 पदांसाठी लवकरच जाहीरात निघू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, आजच्या बैठकीत छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झाल्याचे दिसून येत नाही.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीस यांनी घेतली PM मोदी यांची भेट, ‘या’ तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

आजच्या मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

1) कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेतील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तसेच योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594.09 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता.
या योजनेतून अवर्षण प्रवण भागात 1,08,197 हेक्टर क्षेत्राला लाभ
(जलसंपदा विभाग)

2) अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी, यासाठी 22.37 कोटी रुपये इतका निधी खर्च करणार
(गृह विभाग)