आज काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार घेतील आता काँग्रेसच्या पुर्ण नियुक्तींमध्येही ‘सकपाळ’ पॅटर्नचं!; महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आणि संघटनात्मक बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या आज अध्यक्ष पदाचा पदभार घेती त्यानंतर ते आपली महाराष्ट्रातील नावी कार्यकारणी जाहीर करतील.

लोकसभेला चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करण्यात येणार हे जवळपास निश्चित मानलं जात होत. त्यामुळे या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर येत होती. मात्र या सर्व दिग्गज नावांना डावलून काँग्रेस संघटनात्मक काम करणाऱ्या एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सकपाळ यांची निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांना हर्ष झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ज्या प्रकारे दिग्गजांना डालून संघटनात्मक काम करणाऱ्या नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातील इतर नियुक्तीच्या वेळी देखील प्रस्थापितांना डावलून नव्यांना संधी देण्यात येईल अशी, अपेक्षा करण्यात येत आहे.

अधिक वाचा  शेअर बाजाराचा फुगा फुटत आहे इतिहासातील सर्वात मोठी घसरण; 1929 सारखी परिस्थिती होणार; शेअर बाजाराबाबतचा मोठा अंदाज

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी गेले काही दिवस अमित देशमुख, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार, ॲड. यशोमती ठाकूर, नितीन राऊत, अशा बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र या सर्वांना डावलून हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आणि संघटनात्मक बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या मंगळवारी अध्यक्ष पदाचा पदभार घेतील त्यानंतर ते आपली महाराष्ट्रातील नावी कार्यकारणी जाहीर करतील.

या कार्यकारणीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. हर्षवर्धन सकपाळ यांना शुभेच्छांचे फोन करून त्यांची भेटण्याची वेळ या नेत्यांकडून मागितली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन आपण मागील कार्यकारणीमध्ये दिलेलं पद कशाप्रकारे सांभाळलं याबाबत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या तळागाळातील नेत्यांना मात्र आता हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सघटनात्मक काम करणाऱ्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा विश्वास वाटत आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘ कोथरूड शिवजयंती महोत्सव २०२५’ ला उत्साही प्रतिसाद; आज मोठ्या पडद्यावर ‘छावा’ चित्रपटा चे आयोजन

शहराध्यक्षासाठी देखील फिल्डिंग-

तसेच दुसरीकडे पुणे शहरात सध्या प्रभारी अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे हे काम पाहत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अरविंद शिंदे यांना बदलून नवा शहराध्यक्ष करावा यासाठी शहरातील काही नेते फिल्डिंग लावताना पाहायला मिळत आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना शहराध्यक्ष बदलण्याबाबत स्थानिक नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मात्र नाना पटोले अरविंद शिंदे यांच्या वरच विश्वास दाखवला.

मात्र आता प्रदेशाध्यक्ष बदलाल्याने पुन्हा एकदा नव्या प्रदेशाध्यक्षाकडे शहराध्यक्ष बदलण्याबाबतची फिल्डिंग लावण्यास काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. तिकडे शहराध्यक्ष बदलण्याबाबत फिल्डिंग लावण्यात येत असताना दुसरीकडे मात्र अरविंद शिंदे यांना प्रभारी शहराध्यक्ष न ठेवता पूर्णवेळ शहराध्यक्ष करावं यासाठी देखील फिल्डिंग लावण्यात येत आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका ‘प्रशासकराज’ अधिकाऱ्यांची अनाधिकृत बांधकाम व्यावसायिक सलगी कायमच; एकीकडे मनाई दुसरीकडे ताबा देण्याची लगीनघाई 

काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष बनवल्यानंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील आता हर्षवर्धन सकपाळ पॅटर्न प्रमाणेच सर्व नियुक्त्या होतील अशी अपेक्षा आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.