बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येला जवळपास 70 दिवस झाले आहे. न्याय नाही मिळाला तर आर पारची लढाई लढू, अशी टोकाची भूमिका मस्साजोगच्या गावकऱ्यांनी घेतली आहे. आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मस्साजोगकर थेट मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 70 दिवस होत आले आहे. अद्याप सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यामुळे आता आपल्या गावच्या सरपंच अण्णाच्या न्यायासाठी मसाजोगच्या गावकऱ्यांची टोकाची भूमिका घेतली आहे. प्रशासनावर विश्वास नाही आपण सर्वजण मिळून राज्यपालाची भेट घेऊ तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावर विश्वास राहिला नाही, अशी देखील चर्चा यावेळी झाली.
गावकऱ्यांचा अन्नत्यादाचा इशारा
आजच्या बैठकीत सर्व गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्या संदर्भांत चर्चा झाली. आंदोलनावर गावकऱ्यांचे एकमत झाले आहे. न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन करायचे, यावर गावकऱ्यांनी हात वर करून अनुमोदन दिले आहे. ग्रामस्थांनी अगोदर एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करणार आहे. प्रशासन आलं तर त्यांना सांगू मंत्रालयावर जाऊन सर्व गावकऱ्यांनी आत्मदहन करायचं. थेट मंत्रालयावर आंदोलन करण्याची गावकऱ्याच्या बैठकीत चर्चा झाली. 25 फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाला अल्टिमेटम त्यानंतर अन्नत्याग आंदोलन करण्यावर गावकरी ठाम असून पुढील आंदोलनाची दिशा ठरली.
मस्साजोगकरांच्या प्रमुख मागण्या काय?
पीआय महाजन पीएसआय राजेश पाटीलला सह आरोपी करा
कृष्णा आंधळेला अटक करा
उज्वल निकमांची तात्काळ नियुक्ती करा
प्रकरण फास्ट कोर्टात चालवा
आरोपींना पळून नेल्याची मदत करणाऱ्यांना सीडीआर करून त्यांना आरोपी करा
घटना झाल्यावर कळमच्या दिशेला गाडी का गेली याची चौकशी करा
आवादा कंपनीची भूमिका स्पष्ट करा
वाशी पोलीस ठाण्याचे पीआय रमेश घुले यांना बडतर्फ करून सहआरोपी करा
धनंजय देशमुख यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवा
आता आर पारची लढाई…
गृहमंत्र्यांना एक निवेदन तयार करू त्यावरती गृहमंत्री काय उत्तर देतात त्यावर वाट पाहू…आठ दिवसाची मुदत त्यांना देऊ आणि त्यानंतर आपलं आंदोलन करू. गृह मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर तीव्र आंदोलन करू. त्याचबरोबर राज्यपालांना ही निवेदन जन संदर्भात चर्चा झाली आवादा कंपनीची भूमिका अद्याप पर्यंत समोर आलेली नाही ती भूमिका देखील समोर आली पाहिजे. खंडणी प्रकरणात त्यांनी पण पुरावे प्रशासनाला दिले पाहिजेत. गृहमंत्री मुख्यमंत्री कोणीही असो आम्ही मागे सरकणार नाही, असे गावकरी म्हणाले.