पुणे शहराचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणून बाणेर बालेवाडी या भागाची स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली ओळख आज अभिमानास्पद असतानाच कोथरूड मतदारसंघातील ‘हिंदुत्वाचा बालेकिल्ला’ अशी ओळख निर्माण करत जनसेनेच ‘अन् मोल’ शास्त्र उदयास येत असून जनसेवेची घरात मिळालेली परंपरा ‘कमळ’ हाती घेऊन ‘तळागाळा’तील लोकांच्या जनसेवार्थ अमोल बालवडकर हा ‘छावा’ स्मार्ट सिटीच्या नाविन्याच्या ‘झालर’मध्ये ‘हिंदुत्वाचे तोरण’ घरोघरी पोहोचवण्यामध्ये मग्न आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमधील प्रभाग क्रमांक- ९ भारतीय जनता पक्षाचा मैलाचा दगड म्हणून या नेतृत्वाची भरभराटी आणि वाटचाल सुरू आहे. अशा या हिंदुत्ववादीच्या छाव्यास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
भारतीय जनता पक्ष आणि त्याच विचाराला पाठिंबा देत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा विजय सुकर करण्यात 2009 2014 2019 आणि 2024 सलग ४ वेळा या प्रभागात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केलेल्या कामाची प्रचिती पक्षातील नेत्यांनाही आहे. सुरुवातीला 2024 मध्ये अधिकृतपणे या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी मनातील इच्छा व्यक्त केल्यानंतर ‘कोथरूड’ मध्ये नवा ट्विस्ट आला अन् ‘छाव्या’च्या स्वाभिमानी अन विनीत भूमिकेमुळे पक्ष नेतृत्वाला नव्या पिढीचा एक सक्षम चेहरा मिळाला असून कमळ हाती घेऊन तळागावातील लोकांच्या सेवार्थ एक टीम तयार झाली आहे. कोथरूड भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हे मान्य केल्यानंतर या बालेकिल्लातील प्रभाग 9 एक तरबेज आणि सक्षम शिलेदार(सरदार) म्हणून या छाव्या कडे पाहिले जात आहे. कोथरूड मधील सुमारे 1 लाख 30 हजारांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या या भागातील संघनिष्ठीत श्रीराम भक्त हिंदुत्ववादी नव्या छाव्याची कार्यपद्धती ‘कमळ’ हाती अन् ‘तळागाळा’ची नाती याच्या जीवावर स्मार्ट बाणेर बालेवाडीतील जनसेनेच ‘अन् मोल’ शास्त्र नवी ओळख निर्माण होत आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य नवी पिढी हिंदुत्वाच्या विचाराने मतदारसंघांमध्ये कार्यरत असताना त्यांच्यासाठी अमोल बालवडकर यांचे कार्य आणि कार्यपद्धती एक आदर्शवत उदाहरण निर्माण झाले आहे. सेवाभावी वृत्ती विनम्र व्यक्तिमत्व आणि भविष्याचा वेध घेणारी कृती या तिहेरी संगमाच्या जोरावरती भारतीय जनता पक्षाचे अविरत कार्य या भागामध्ये सुरूच आहे म्हणूनच कोथरूड विधानसभा मतदारसंघ म्हटलं की एकच नाव येतं ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणखी मजबूत करणारे अमोल(भैय्या) रतन बालवडकर! पुणे महापालिकेच्या लांबलेल्या निवडणुका ही काही जणांसाठी अडचण बसत असली तरी सुद्धा प्रभाग न मधील भारतीय जनता पक्षाचे अमोल बालवडकर ही संधी जनसेवार्थ व्यतीत करून ‘आत्मसंतुष्टी’ मात्र मिळवत आहे.