विकी कौशलच्या मुख्य भूमिकेत असलेला ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाचे तिकीट हाऊसफूल्ल झाले होते. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने जवळपास 17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई तब्बल 31 कोटी रुपये इतकी होती.

दरम्यान विकी कौशल याने चित्रपट प्रदर्शनानंतर चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. इन्टाग्रामवर पोस्ट लिहित त्याने सर्वांचे आभार मानलेत. तसंच ‘छावा’ चित्रपट कसा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला याबद्दल तो व्यक्त झाला आहे.

विकी कौशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिलय की, ‘तुमच्या प्रेमाने ‘छावा’ला खऱ्या अर्थाने जिवंत केलय. सर्वांचे येणारे मॅसेज, फोन, चित्रपट पाहताना शेअर केलेले व्हिडिओ हे सगळं पाहून मी भारावलो आहे. तुमचं इतकं भरभरुन प्रेम दिलं त्यासाठी सर्वाचे आभार..’ असं कॅप्शन लिहीत ‘विश्वास आपका साथ हो, तोयुद्ध लगे त्योहार!’ असं पोस्टमध्ये विकीने म्हटलं आहे.

अधिक वाचा  “सहा महिने थांबा, आणखी एकाचा बळी जाणार…” सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट

पहिल्याच दिवशी छावाची रेकॉर्डब्रेक कमाई

‘छावा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 31 कोटींची कमाई केली आहे. 2025 मध्ये पहिल्या दिवशी एवढी कमाई करणारा विकी कौशलचा पहिला चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवसाची कमाई बघता काही दिवस हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता आहे.