अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा हा चित्रपट येत्या 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होतेय. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे.विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगध्ये तब्बल 10 कोटी रुपये कमवले आहेत. निर्मात्यांकूडन या निर्मात्यांकडून या चित्रपटाचे जोमात प्रमोशन केले जात आहे. दरम्यान, या चित्रपटात आता अजय देवगण महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

अजय देवगणवर महत्त्वाची जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात अजय देवगण हा अभिनेता म्हणून दिसणार नाही. मात्र त्याला या चित्रपटात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय देवगणच्या या कामामुळे चित्रपटाच्या कथानकाला तसेच सादरीकरणाला आणखी वजन प्राप्त होणार आहे.

अधिक वाचा  गंगाधाम चौकात भीषण अपघातानंतर जड वाहनांवर सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत तात्पुरती बंदी

छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणार?

छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहांत येत आहे. संपूर्ण भारतभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांचे पात्र साकारतोय. तर रश्मिका मंदाना या चित्रपटात महाराणी येसुबाई यांची भूमिका करताना दिसेल. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग पाहता प्रदर्शनानंतर तो बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता अजय देवगण या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिसणार आहे. त्यामुळे अजय देवगणचे फॅन्सही हा चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहेत.

अधिक वाचा  वानवडीतील गृहप्रकल्पात फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी पुणे न्यायालयाची विकासकांवर कारवाई

अजय देवगणवर नेमकी जबाबदारी काय असणार?

अभिनेता अजय देवगणवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय देवगण चित्रपटात व्हॉईस ओव्हर देणार आहे. म्हणजेच छावा चित्रपटाचे कथानक चालू असताना अजय देवगणचा व्हाईस ओव्हर ऐकता येणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने त्याचे व्हॉईस ओव्हरचे काम पूर्णदेखील केले आहे.

अजय देवगनने केलेली आहे मावळ्याची भूमिका

अजय देवगणचा या चित्रपटात व्हॉईस ओव्हर (नरेशन) असल्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. विशेष म्हणजे अजय देगवणने याआधी तानाजी या चित्रपटात शिवरायांच्या मावळ्याची भूमिका केलेली आहे. हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्यामुळे देखील छावा या चित्रपटाचे आणि अजय देवगणचे खास कनेक्शन जुळले आहे, असे म्हटले जातेय.

अधिक वाचा  Viral Video : नवरा मुलगा मिरवणुकीत झाला आऊट ऑफ कंट्रोल, रथावर बेभान होऊन नाचला

अजय देवगणच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा

दरम्यान, अजय देगवणचे गेल्या वर्षी अनेक चित्रपट आले होते. मात्र शैतान चित्रपटाव्यतिरिक्त त्याचे अन्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकले नाहीत. आता अजय देवगणच्या आगामीच चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.