भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 ने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात भारताची सुरुवात अडखळत झाली. अवघी एक धाव करून रोहित शर्मा बाद झाला. पण त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला. शुबमन गिलने वनडे क्रिकेटमधील सातवं शतक ठोकलं. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चांगल्या फॉर्मात असल्याचं दाखूवन दिलं. विराट कोहलीला शेवटच्या सामन्यात सूर गवसला. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. श्रेयस अय्यरनेही मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. भारताने 50 षटकात सर्व गडी गमवून 356 धावा केल्या आणि विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही इंग्लंडला गाठता आलं नाही. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पराभव सहन करावा. इंग्लंडने षटकात सर्व गडी गमवून 214 धावा केल्या. भारताने तिसरा सामना 142 धावांनी जिंकला.

अधिक वाचा  बीडमध्ये ‘लाडक्या वकील बहिणी’चं रक्त साकळेपर्यंत मारहाण नावं समजली; दादागिरी महागात, कठोर कलमे

भारताने विजयासाठी दिलेल्या 357 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. फिलीप सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. तर टॉम ब्रॅडनने सॉल्टसह ही भाीदारी वाढवली. पण त्यानंतर घसरगुंडी सुरु झाली. मधल्या फळीतील फलंदाज सपशेल फेल ठरले. जो रूट, जोस बटलर स्वस्तात बाद झाले. इंग्लंडच्या अशा खेळीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी चांगल्या खेळीच्या अपेक्षा आता मावळल्या आहेत. इंग्लंडचा संघ भारताच्या गटात नाही. पण इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली तर भारताशी सामना होऊ शकतो.