नवी दिल्ली – विधानसभेतील पराभवानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील संघटनेत बदल करण्यात येत आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते. सपकाळ हे सचिन राव व मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात.

काँग्रेस नेतृत्वाला असे सूचित करण्यात आले की, ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावे. तिसऱ्यांदा आमदार झालेले विश्वजित कदम यांना काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यावर विचार करत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

राजकीय कारकीर्द अशी…

  • हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
  • महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
  • सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन,
  • ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे.
  • २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली.
अधिक वाचा  पुणे अर्बन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कर्वेनगर – वारजे परिसरातील भगिनींसाठी मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्कचे मोफत प्रशिक्षण शिबीर

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांचही नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी बुलढाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि गांधी घराण्याशी जवळीक असल्याने तेही रेसमध्ये आहेत. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय सहभागी राहिले आहेत. सन 2014 ते 19 या काळात बुलढाणा विधानसभेच प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. तर, सध्या राजीव गांधी पंचायत राज संघटनचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी जिवनोत्थान कार्यक्रम सक्रियतेने राबवून आदिवासी बांधवांमध्ये “गळ्यातील ताईत” म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे, विदर्भातील नेत्याला राज्याचे नेतृत्व देऊन काँग्रेसकडून राजकीय डाव टाकला जाऊ शकतो.

अधिक वाचा  सरकार केवळ जातीय दंगली भडकावण्याचे काम करतय! 100 दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार; यशोमती ठाकूर यांचा दावा