नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका सत्कार सोहळ्यात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्ष फुटीस कारणीभूत असलेल्या एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवार यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी यावर पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा केलेल्या सत्कारानंतर पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाची ही अधिकृत भूमिका आहे.
ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करणे टाळायला हवं होतं, असं मत उद्धव ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
मविआचं काय होणार?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कालच्या सत्कार सोहळ्यावरुन नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं टाळायला हवं होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीनं महायुतीला ज्या प्रकारे विरोध केला होता त्यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं ठाकरेंच्या शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेला पटलेलं नाही. उद्धव ठाकरे यांची अधिकृत भूमिका संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून सेनेच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणून आगामी तीन प्रमुख पक्षांची भूमिका असेल हे लवकरच कळेल.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील नियोजित कार्यक्रम होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख विरोधक एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा सत्कार शरद पवार यांनी केल्यानं राजकीय चर्चा सुरु होतात. यामुळं सत्कार टाळायला हवा होता, असं ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांचं मत आहे.
संजय राऊत यांची शरद पवार यांच्यावर टीका
खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शरद पवारांवर टीका केली होती. एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं म्हणजे अमित शाह यांचा सत्कार करण्यासारखं आहे, असं राऊत म्हणाले.