अभिनेता सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला आज कोर्टात हजर करण्यात आलं पण, त्याआधी पोलिसांची गाडी बंद पडली. त्यावेळी पोलिसांनी गाडी धक्का मारला पण, गाडी सुरु झाली नाही. दरम्यान, तरीही गाडी सुरु झाली नाही. आरोपीची पोलिस कोठडी संपल्याने त्याला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी 19 जानेवारीपासू पोलिस कोठडीमध्ये आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा पोलिस तपास करत असून आरोपी विरोधात भक्कम पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आता आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामखेड बाबत मोठा निर्णय ! रोहित पवार यांना धक्का, आता राम शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक

सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी बंद पडली

सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला आज न्यायालयात घेऊन जाण्यासाठी पोलिस बाहेर पडले. आरोपीला पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलिस निघाले. पण, अचानक गाडी बंद पडली. यानंतर पोलिसांना उतरुन गाडीला धक्का मारावा लागला. पोलिसांनी धक्का मारुनही गाडी स्टार्ट झाली नाही, त्यानंतर पोलिसांना दुसऱ्या गाडीतून जावं लागलं.

पोलिसांनी धक्का मारला, पण गाडी स्टार्ट होईना

पोलिस आरोपीला एका मोठ्या गाडीतून घेऊन जात होते, पण गाडी पोलिस स्टेशनपासून सुमारे 100 मीटर अंतरावर पोहोचताच थांबली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब गाडीतून खाली उतरून गाडी ढकलण्यास सुरुवात केली, पण गाडी सुरू न झाल्याने आरोपीला ताबडतोब एका लहान गाडीत हलवण्यात आले आणि पोलिसांनी आरोपीला न्यायालयात नेलं.

अधिक वाचा  “आरएसएस हे विष आहे”, तुषार गांधींच्या विधानावरून वाद; माफीच्या मागणीस स्पष्ट नकार! गांधींच्या मारेकऱ्याचे वंशज आता…. भिती व्यक्त 

नेमकं काय घडलं?

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलिस कोठडी बुधवारी संपल्यानंतर, मुंबईतील त्याला वांद्रे पोलिसांनी वांद्रे न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना ही घटना घडली. सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद याची पोलिस कस्टडी आज संपली.

त्यानंतर त्याला 29 जानेवारी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांकडून त्याच्या अधिक चौकशीसाठी पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. आरोपीविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी यावेळी न्यायालयात केला. न्यायालयाने आरोपी आणि पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यावर आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली.

अधिक वाचा  वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची मुसंडी; थलायवा रजनीकांतलाही पछाडलं, ‘छावा’नं पार केला 750 कोटींचा आकडा