देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होईल. मोदी 3.0 सरकारच्या या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी रोजी 8 व्या वेळा देशाचे बजेट सादर करतील. केंद्रीय अर्थमंत्री सकाळी 11 वाजता बजेट सादर करतील. या अर्थसंकल्पाविषयी सर्वांना उत्सुकता आहे. सगळ्यांचे तिकडे लक्ष लागले आहे. बजेट तुम्हाला कुठे आणि कधी पाहायला मिळणार, हे जाणून घ्या एका क्लिकवर…

येथे पाहा देशाचा अर्थसंकल्प

तुम्ही देशाचा अर्थसंकल्प विविध प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण नेहमीप्रमाणे डीडी न्यूजवर पाहता येईल. याशिवाय डीडी नॅशनलवर सुद्धा अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण होईल. आता स्मार्टफोन एजच्या जमान्यात तुमच्या मोबाईलवर तुम्ही डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही केंद्रीय अर्थसंकल्प पाहू शकता.

अधिक वाचा  दिवंगत संतोष देशमुखांच्या पक्क्या घराची वीट रचली, महंतांकडून भूमिपूजन; शिंदेंनी शब्द पाळला

संसद टीव्ही

दूरदर्शन प्रसारण

संसद टीव्ही आणि दूरदर्शनचे YouTube चॅनल थेट प्रवाह

अर्थ मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट थेट पाहा

याठिकाणी बजेट वाचा PDF

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये काय घोषणा केल्या. काय स्वस्त झाले, काय महाग झाले. कोणता कर कमी झाला, कोणता कर वाढला याचा सर्व तपशील सरकार, त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करते. www.indiabudget.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना बजेट हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. नागरिकांना बजेट दस्तऐवज तिथे पाहू शकाल. हे PDF स्वरूपात उपलब्ध असतील, जे तुम्ही डाउनलोड, पाहू आणि वाचू शकता.

अधिक वाचा  अयोध्येतील राम मंदिरांने सरकारचा खजिना भरला, अब्जावधीचा कर दिला, ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांची माहिती आकडा एकदा वाचा!