पुणे: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, लिबर्टी जनरल इन्शुरन्स ने एक विचारप्रवर्तक मोहिम फिल्म सादर केली आहे, जी “लिबर्टी म्हणजे नेमकं काय?” या प्रश्नावर सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकते. हा चित्रपट लोकांना आत्मपरिक्षण करण्यास प्रवृत्त करतो आणि आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो.

या मोहिमेच्या संदर्भात लिबर्टी जनरल इन्शुरन्सचे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक, पराग वेद म्हणाले, “लिबर्टी” हा शब्द केवळ एक संकल्पना नाही, तर तो लोकांना निर्भय व निर्धास्त जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याचे आमचे वचन आहे. हा चित्रपट आमच्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे—आमच्या ग्राहकांना आत्मविश्वास आणि शांतता प्रदान करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो, जेणेकरून ते आयुष्यातील प्रत्येक संधी आनंदाने स्वीकारू शकतील. स्वातंत्र्य हे जरी वैयक्तिक असले तरी ते सामूहिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि आमच्या विश्वासार्ह सेवा आणि मदतीच्या माध्यमातून आम्ही या भावनेचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतो.”

अधिक वाचा  शेअर बाजाराचा फुगा फुटत आहे इतिहासातील सर्वात मोठी घसरण; 1929 सारखी परिस्थिती होणार; शेअर बाजाराबाबतचा मोठा अंदाज