टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा राजकोटमध्ये होणार आहे. टीम इंडियाची या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यासाठी कॅप्टन सूर्यकुमार यादव प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकतो. साधारणपणे विजयी संघातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले जात नाहीत. विजयी संघातील त्याच 11 खेळाडूंना संधी दिली जाते. मात्र सूर्यकुमारने या पद्धतीला छेद दिला आहे. तिसऱ्या सामन्यातून कुणाचा पत्ता कट होऊ शकतो? हे आपण जाणून घेऊयात.

ऑलराउंडर शिवम दुबे आणि रमनदीप सिंह हे दोघे टीम इंडियासह जोडले गेले आहेत. त्यामुळे या दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवमला नितीश कुमार रेड्डी याच्या जागी संघात समावेश करण्यात आला. नितीशला दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं. तसेच रिंकु सिंह याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी रमनदीप सिंग याचा समावेश करण्यात आला आहे. रिंकूला पाठीच्या खालील भागाला असलेल्या दुखापतीमुळे तो तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नाही.

अधिक वाचा  शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ३३७ कोटींचा बॉम्ब; हिशोबच लागत नाही भाजपकडून प्रश्नांची सरबत्ती, विषय पुन्हा तापला

शिवम दुबे याने टी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत स्पिनर्सविरुद्ध आक्रमकपणे बॅटिंग केली होती. त्यामुळे शिवम आदिल रशीदसमोर कसा खेळतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. तसेच रमनदीप सिंह हा फटकेबाजी करण्यात माहिर आहे. तसेच दोघे बॅटिंगसह बॉलिंगनेही योगदान देतात. त्यामुळे या दोघांचा संधी मिळण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत अधिक आहे. आता या दोघांना संधी द्यायची म्हटल्यावर डच्चू कुणाला द्यायचा किंवा मिळणार? हा प्रश्न साहजिक आहे.

संधी दोघांना;डच्चू कुणाला?

शिवम दुबे आणि रमनदीप सिंग या दोघांना संधी दिल्यास कुणाला आऊट केलं जाईल? हे जाणून घेऊयात. शिवम आणि रमनदीपसाठी रवी बिश्नोई आणि ध्रुव जुरेल या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर केलं जाऊ शकतं. त्याचं कारणही तसंच आहे. रवी बिश्नोईला या मालिकेत एकही विकेट घेता आलेली नाही.तसेच ध्रुव जुरेल चेन्नईत झालेल्या दुसऱ्या टी 20i सामन्यात 4 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे या दोघांना डच्चू मिळण्याची अधिक शक्यता आहे

अधिक वाचा  एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याला देणार संधी

तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी इंग्लंड टीम : बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.

तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रमनदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.