विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कोल्हापूर जिल्ह्यावर पालकमंत्री पदावर कोण राहणार याची? महायुतीमध्ये स्पर्धा लागली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून दावा प्रति दावा केला जात होता. शनिवारी (ता.18) पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली.

या यादीत कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर अखेर शिंदे यांच्या शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तर मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोल्हापूर पासून संपर्क तुटलेल्या उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरच्या जवळ आणून सांगलीचे पालकमंत्री पद दिले आहेत.

अधिक वाचा  भारताच्या गोलंदाजीचा कणा मोडला, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, कुणाला संधी?

महायुती सरकारच्या मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काम पाहिले होते. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी मुश्रीफ आग्रही होते. भाजपच्या सूत्रानुसार ज्येष्ठ आणि अनुभव असणाऱ्या नेत्यांना पालकमंत्री पदाची धुरा दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे जास्त आमदार असल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरचा दावा कायम ठेवला होता. राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चांगलीच स्पर्धा लागली होती. मात्र यात शिंदेंच्या शिवसेनेने विजय मिळवला. आबिटकर यांना पालकमंत्री पद मिळताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.

अधिक वाचा  एकनाथ शिंदे सत्काराची राऊतांची शॉकेबल ‘तांडवलीला’ सुरू असतानाच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया…. ‘त्यांच्या चेहऱ्यावर एक’

तर हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले आहे. महाविकास आघाडीच्या काळात ग्रामविकास मंत्री असताना मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले होते. त्यानंतर महायुतीच्या काळात त्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर मोहर उमटवली होती. मात्र आता वाशिमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे.

तर दुसरीकडे सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात एकही स्थान मिळाले नसल्याने, सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री पदावर कोण येणार याची चर्चा लागून राहिली होती. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोल्हापूर पासून दुरावलेले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगलीचा पदभार देण्यात आला आहे. यापूर्वी युतीच्या काळात चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे, तर महायुतीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले होते.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल.. आता तरी एकत्र या ! राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कोणी दिली साद ?

दरम्यान, कोल्हापूरला यावेळी दोन पालकमंत्री पद देण्यात आले आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना सह पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.