राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल (21 डिसेंबर)ला जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे.

एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी ठरल्याची चर्चा-

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे दुसऱ्या स्थानावर आहे. मंत्रिमंडळात भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे महत्वाचे खाती आहेत. नगरविकास,गृहनिर्माण,सार्वजनिक बांधकाम खाती तसेच एमएमआरडी, सिडको, एमएसआरडीएवर एकनाथ शिंदे यांचाच ताबा राहणार आहे. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही एकनाथ शिंदेंच्या हाती असणार आहे. अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्यातरी खर्चाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे राहणार आहे. एकनाथ शिंदेंनी गृह खात्यासाठी आग्रह धरला होता. मात्र एकनाथ शिंदेंनी गृहनिर्माण खातं मिळवल्याने एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अधिक वाचा  बीड सरपंच हत्या प्रकरण मोठी घडामोड, मुख्यमंत्र्यांचा SP, CID ला फोन, शासकीय विश्रागृहावर हालचाली वाढल्या

शिवसेनेला नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपद-

शिवसेना शिंदे गटाकडून 11 आमदारांनी गेल्या आठवड्यात नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही महत्त्वाची खाती तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा मंत्रालये देण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची खाती अनुक्रमे प्रकाश आबिटकर आणि दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. भरत गोगावले यांच्याकडे परिवहन, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण, पर्यटन, खाणकाम, शंभूराज देसाई यांच्याकडे माजी सैनिक कल्याण आणि संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रिपदांव्यतिरिक्त, पक्षाला राज्यमंत्रीपदेही मिळाली आहेत. आशिष जैस्वाल यांच्याकडे वित्त आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार, योगेश कदम यांना गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न या खात्यांचे राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. नवीन सरकारमध्ये नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शिवसेनेला मिळाले आहे. शिवसेनेने पाच जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर तीन जणांना मंत्रिमंडळातुन वगळले आहे.

अधिक वाचा  धनुभाऊंना नैतिकता स्पर्श करेना ‘दादा’श्रय; याआधी या ११ मंत्र्यांनी आरोपांनंतर राजीनामा दिलेला!

एकनाथ शिंदेंकडे कोणकोणत्या खात्यांची धुरा?

नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग.

शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठली खाती?

कॅबिनेट मंत्री

1. उदय सांमत – उद्योग व मराठी भाषा

2. प्रताप सरनाईक – वाहतूक

3. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

4. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास

5. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

6. दादा भूसे – शालेय शिक्षण

7. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

8. संजय राठोड – मृदा व जलसंधारण

अधिक वाचा  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रशासनाच्या हालचालींना वेग

9. संजय शिरसाट – सामाजिक न्याय

राज्यमंत्री

10. योगश कदम – ग्रामविकास, पंचायत राज

11. आशिष जैस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय