मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या बहि‍णीच्या मुलाचा लग्न सोहळा संपूर्ण राज्यासाठी सुखद ठरला आहे. कारण या लग्न सोहळ्यात दोन मामा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहे. दोन्ही भावांनी यावेळी कौटुंबिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संवाद साधला. हे दृश्य पाहुन मराठी माणूस सुखावला. टोकाच्या भूमिकेनंतर दोन्ही भावांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांनी एकत्र यावे अशी आर्त हाक यापूर्वी सुद्धा मराठी माणसाने दिली आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासंबंधी संकेत दिले होते. एकमेकांचे कट्टर दुश्मन एकत्र येऊ शकतात, पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळच वाटते असं त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं.

अधिक वाचा  आदित्य ठाकरे यांच्या विश्वासूसह ठाकरे गटाला खिंडार; अनेक शिवसैनिक थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीत दाखल

दोन्ही ठाकरेंमध्ये संवाद

दादर येथील विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या कौटुंबिक सोहळ्यात दोन्ही नेत्यांनी संवाद ही साधला. यावेळी खेळीमेळीचे वातावरण दिसले. दोन्ही भावात काही वेळ एकमेकांशी संवाद साधल्याचे दिसले. यापूर्वीच्या सोहळ्यात आणि कार्यक्रमात दोन्ही बंधू एकत्र दिसले होते. पाच दिवसांपूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं होते.

रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात राज ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले होते. पण दोन्ही बंधुची भेट थोडक्यात हुकली होती. पण या लग्न सोहळ्यात दोन्ही बंधु एकत्र आल्याचे दिसून आले.

अधिक वाचा  भवानीमाता गाभाऱ्याला पुरातन झळाळी; मंचकी निद्रेतून तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान देवीची मुर्ती ही चल मुर्ती गाभाऱ्याचे काम पूर्ण

महापालिका निवडणुकीत एकत्र येतील?

विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यात एकला चलो रे चा नारा दिला होता. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला. त्यांची एकही जागा निवडून आली नाही. तर दुसरीकडे ठाकरे गटालाही अपेक्षित यश मिळाले नाही.

भाजपाने आपली फसवणूक केल्याचे मत मनसे कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर व्यक्त केले होते. तर ईव्हीएमवरून मनसे आणि शिवसेने यांनी सूर आळवला होता. त्यामुळे आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाविरोधात हे दोन्ही बंधू एकत्र येतील का? असा सवाल विचारण्यात येत आहे.