‘गदर’ आणि ‘अपने’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर यांना घेऊन ‘वनवास’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर हे दोघेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर ‘वनवास’ हा चित्रपट २० डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मीका यांचा ‘पुष्पा२’ हा चित्रपट चित्रपटगृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे हॉलीवूड चित्रपट ‘मुफासा’ही रिलीज झाला आहे. त्याच दरम्यान आता ‘वनवास’ हा चित्रपट रिलीज झाला असून पहिल्याच दिवशी वनवास चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला नाहीये. कारण आधीच प्रदर्शित झालेला पुष्पा २ आणि मुफासा हे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे. त्यामुळे याचा फटका वनवास चित्रपटाला बसला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा पहिल्या दिवशी किती कमाई झाली आहे हे जाणून घेऊयात.

अधिक वाचा  पुण्यात वैशाली हॉटेलजवळ आकानं…; वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचे धस यांच्याकडून धक्कादायक खुलासे

‘वनवास’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर यांच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी रात्री साडेदहा वाजेपर्यंत ६० लाखांची कमाई केली आहे. तसेच सेकनिल्कवर उपलब्ध असलेली ही आकडेवारी अंतिम नसल्याचे सांगितले आहेत. तर अंतिम आकडेवारी आल्यानंतर त्यात फेरबदल केले जाऊ शकतात.

कोइमोईच्या अंदाजानुसार वनवास हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २ कोटी पेक्षा कमी कलेक्शन करू शकेल. तर पिंकविलाच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट 1 कोटींचा व्यवसाय करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आतापर्यंतची कमाई पाहता निराशा पाहायला मिळालेली आहे.

‘वनवास’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे का ?
‘वनवास’ चित्रपट पाहिलेल्या समीक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट चांगला आणि पाहण्याजोगा आहे. चित्रपटाची कथा बाप-लेकाच्या नात्यावर विणलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट कुटुंबासमवेत पाहता येणार आहे.

अधिक वाचा  बीड परभणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून संवेदनशीलतेचं दर्शन, कुटुंबियांना मोठा दिलासा; सरकारी नोकरी देण्याचा निर्णय

‘पुष्पा २’ आणि ‘मुफासा’मुळे ‘वनवास’ चित्रपटाचे नुकसान?
पुष्पा २ अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटाने 1000 कोटींची कमाई केली आहे.आणि अजूनही कमाईमध्ये पुष्पा २ दुहेरी आकडा ओलांडत आहे. त्याचबरोबर हॉलिवूड चित्रपट मुफासानेही पहिल्या दिवशी 10 कोटींची कमाई केलीय.

अशा तऱ्हेने प्रेक्षकांच्या पसंतीमुळे त्यांचा वनवास चित्रपटाकडे कल कमी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र विकेंडच्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात चित्रपटाला किती फायदा होतो, हे येत्या काही दिवसांची कमाई सांगेल.