आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसऱ्या साखळी अंतर्गंत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा सामना हा 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते. टीम इंडियाला मेलबर्नमध्ये विजयाची संधी अधिक आहे. त्याची 3 प्रमुख कारणं आहेत. आपण सविस्तर जाणून घेऊयात.

अधिक वाचा  ‘माझ्या अब्रुची…’ चहलसोबत घटस्फोटाच्या अफवा उडत असताना अखेर चहलची पत्नी धनश्री वर्मा भडकली, म्हणाली..

जोश हेझलवूड आऊट

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हा स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे. याच हेझलवूडने पहिल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. हेझलवूड नसणं हा ऑस्ट्रेलियासाठी धक्का आणि भारतासाठी दिलासा आहे. त्यामुळे हेझलवूडच्या गैरहजेरीत भारतीय फंलदाजांना मोठी खेळी करण्याची चांगली संधी आहे.

भारतीय गोलंदाजांची कामगिरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आतापर्यंत काही अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना अद्याप काही खास करता आलेलं नाही. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह हा एकटाच बॉलिंगने धमाका करतोय. तर त्याला मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांचीही चांगली साथ मिळतेय. त्यामुळे या वेगवान त्रिकुटाकडून मेलबर्नमध्ये अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अधिक वाचा  शाकंभरी नवरात्र प्रारंभ आज सायंकाळी अवकाशात दिसणार नवग्रहांचा नजराणा!; तारांच्या समूहाचे दर्शन एकावेळेस होणे, हा दुर्मीळ योग

टीम इंडिया मेलबर्नमध्ये 13 वर्षांपासून अजिंक्य

टीम इंडिया मेलबर्नमध्ये गेल्या 13 वर्षांपासून अजिंक्य आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर भारताने मेलबर्नमध्ये गेल्या 13 वर्षात एकही कसोटी सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 2014-2015 दौऱ्यातील सामना हा बरोबरीत सोडवला होता. त्यानंतर 2018-2019 आणि 2020-2021 दौऱ्यातील सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे या 3 कारणांमुळे भारताच्या मेलबर्नमधील विजयाची शक्यता वाढली आहे.

चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

अधिक वाचा  विकसित भारतासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण प्रतिभावान पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत : राज्यपाल

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.