ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर आता 26 डिसेंबरपासून उभयसंघात चौथा सामना होणार आहे. चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न येथे होणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे टेस्ट असणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पहिल्या कसोटी सामन्यात धमाकेदार शतक ठोकलं होतं. मात्र त्यानंतर विराटला धावांसाठी संघर्ष करावा लागला. मात्र आता विराटची मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा बॅट तळपणार असल्याचं संकेत आहेत. विराटची आतापर्यंतची मेलबर्नमधील कामगिरी पाहता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अधिक वाचा  विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी, जामीनही मागण्याची शक्यता खंडणीचा तपास पूर्ण; SIT कडून होऊ शकते अटक

विराटची मेलबर्नमधील कामगिरी

विराट कोहली याने मेलबर्नमध्ये आतापर्यंत एकूण 3 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने या तिन्ही सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराटने 3 सामन्यांमध्ये 52.66 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 2 अर्धशतकं आणि 1 शतकही झळकावलं आहे. त्यामुळे विराटकडून चौथ्या कसोटी सामन्यातही मेलबर्नमध्ये अशाच कामगिरीची आशा असणार आहे.

दरम्यान उभयसंघातील तिसरा सामना हा 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवणयात येणार आहे. हा चौथा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहेत. अशात कोणता संघ बाजी मारतो आणि आघाडी घेतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

अधिक वाचा  सुप्रिया सुळे यांचा मोठा आरोप; वाल्मिक कराड प्रकरणात ईडी एन्ट्री हवी होती…

अंतिम 2 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.