एकीकडे नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुंबईत मोठी घडामोड समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

अधिक वाचा  पालकमंत्रिपदाचे वाटप धनंजय मुंडेंमुळे रखडले का? शिंदे गटातील नेत्याची ‘ही’ माहिती; आम्ही मात्र निवडणुका अश्या लढायचं ठरवलेलंय

अज्ञातांच्या हातात आठ ते दहा मोबाईल

दरम्यान, दोन जण संजय राऊत यांच्या घराबाहेर आले. त्यांच्या हातात आठ ते दहा मोबाईल होते. वाहनचालकाच्या हातात मोबाईल होता. तर मागे बसलेल्या व्यक्तीकडे चौरशी पुठ्ठ्यावर अनेक मोबाईल असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे प्रकरण गंभीर : सुनील राऊत

या प्रकरणावर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, घटनास्थळी झोन सात मधील पोलीस विभागाची विविध पथके दाखल झाली आहेत. सीसीटीव्ही आणि आजूबाजूला कसून चौकशी करण्यात येत आहे.जी बाईक होती ती यूपी, बिहारची असावी, बाबा सिद्धीकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे आमदार सुनील राऊत यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  29 नोव्हेंबरचा धक्कादायक पुरावा ‘2 कोटी दे, अन्यथा तुझे हातपाय तोडीन’, वाल्मिक कराडचा पाय खोलात? तपास निर्यायक स्थितीत

दोषींवर कारवाई होणार : उदय सामंत

संजय राऊत यांच्या निवासस्थानी रेकी झाल्याचा प्रश्न विधिमंडळात भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. तर याबाबत उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, अशा पध्दतीने रेकी केली असेल, सभागृहात हा विषय मांडला असेल, तर जे दोशी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.