तेलुगू सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याच्या चाहत्यांचा संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याची लोकप्रियता आता बॉलिवूडपर्यंत देखील पोहचली आहे. हिंदी डब सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अर्जुन याने 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 1: द राइज’ सिनेमातून बॉक्स ऑफिसवर स्वतःला जलवा दाखवला… आता अभिनेता ‘पुष्पा 2 : द रुल’ सिनेमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे. ज्याला हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडचा सर्वात मोठा स्टार म्हटले जाते.
‘पुष्पा 2’ सिनेमाचा दमदार धमाका…
अल्लू अर्जुनच्या सिनेमााल हिंदीत मिळालेल्या ॲडव्हान्स बुकिंगने हे स्पष्ट केले आहे की, तो हिंदी चित्रपटांच्या पहिल्या ओपनिंग रेकॉर्डला जोरदार आव्हान देणार आहे. सांगायचं झालं तर, गुरुवारी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश यांसारख्या शहरांमध्ये सिनेमाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसात मिळाला. जो अद्याप कोणत्या प्रसिद्ध बॉलिवूड स्टार देखील मिळालेला नाही.
ट्रेड रिपोर्ट्सच्या प्राथमिक अंदाजानुसार ‘पुष्पा 2’ च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 66 कोटी ते 68 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जेव्हा अंतिम आकडेवारी समोर येईल, तेव्हा सिनेमाचं हिंदी कलेक्शन 70 कोटींचा टप्पा गाठताना दिसेल. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे.
अल्लू अर्जुनने रचला इतिहास…
हिंदीत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंग कलेक्शनचा रेकॉर्ड शाहरुख खानच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर ‘जवान’च्या नावावर होता. किंग खानच्या ‘जवान’ सिनेमाने 65.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण ‘पुष्पा 2’च्या कमाईच्या अंदाजावरून अल्लू अर्जुनने शाहरुखचा रेकॉर्ड मोडला आहे.
रिपोर्टनुसार, 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ सिनेमाने पहिल्या दिवशी 41 कोटी रुपयांचा गल्ल जमवला होता. त्यानंतर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘KGF 2’ सिनेमाने 54 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता पुष्पा 2 सिनेमात बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. आता येणाऱ्या काही दिवसांत ‘पुष्पा 2’ सिनेमा किती कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.