राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत काही मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ३ मंत्र्यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना नव्या मंत्री मंडळात स्वच्छ चेहऱ्यांच्या आणि भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांचा समावेश न करण्याचे आदेश दिले आहेत. अशामध्ये शिवसेनेच्या ३ माजी मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली आहे.
शिवसेनेच्या या माजी मंत्र्यांना मिळू शकतो डच्चू –
१) संजय राठोड
माजी जलसंधारण मंत्री म्हणून सूमार कामगीरी. तसेच बंजारा समाजातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते.
२) अब्दूल सत्तार –
माजी कृषी मंत्री आणि अल्पसंख्यांक मंत्री विभागांतर्गत कारभारात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे अनेक आरोप करण्यात आलेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती ही नेमण्यात आली आहे.
३) तानाजी सावंत –
माजी आरोग्य मंत्री विभागात कामकाजात आर्थिक गैरव्यव्हाराचे आरोप करण्यात आलेत. तसेच पक्ष संघटनात्नक अनेक नाराजीच्या तक्रारी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेकवेळा आल्या आहेत.