जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि एमएस धोनीसारख्या स्टार्सची नावे समोर येतात. मात्र भारतात असा एक क्रिकेटर आहे ज्याने आजपर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केलेले नाही किंवा आयपीएलमध्येही खेळलेला नाही. मात्र असे असतानाही हा खेळाडू संपत्तीच्या बाबतीत धोनी, विराट आणि सचिनपेक्षा खूप पुढे आहे. या खेळाडूने वयाच्या 22 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली होती.

वयाच्या 22 व्या वर्षी निवृत्त

उद्योगपती कुमार मंगलम यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. आर्यमनने मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफी आणि इतर स्पर्धा खेळल्या आहेत. 2023 मध्ये, आर्यमनला आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लिमिटेडमध्ये संचालक म्हणून सामील करण्यात आले होते. मात्र हे पद स्वीकारण्यापूर्वीच आर्यमनने क्रिकेटपटू म्हणून आपला ठसा उमटवला होता.

अधिक वाचा  सरपंच खून प्रकरण सर्वात मोठी अपडेट! ‘मोकारपंती’ ग्रुप कॉलवर 6 जण पाहात होते LIVE मर्डर; सर्व या वयोगटाचे हे धोकादायक

अशी होती कारकीर्द 

आर्यमन 1997 मध्ये मुंबईत जन्मला होता. कालांतराने तो मध्य प्रदेशातील रीवा येथे गेला. जिथे त्याने ज्युनियर सर्किट क्रिकेटमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. 2017 मध्ये, त्याने मध्य प्रदेशकडून ओरिसा विरुद्ध रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात आर्यमनने रजत पाटीदारसोबत 72 धावांची भागीदारीही केली होती. एका वर्षानंतर आर्यमनने बंगालविरुद्ध चमकदार कामगिरी केली. या सामन्यात बंगालने मनोज तिवारीच्या द्विशतकाच्या जोरावर 510/9 धावा करून डाव घोषित केला. याला प्रत्युत्तर म्हणून बिर्लाने 189 चेंडूत 103 धावांची शानदार खेळी करत सामना अनिर्णित राखण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

अधिक वाचा  2 कोटी खंडणीस नकार माजी उपसरपंचाचा खून; मृतदेहाचे तुकडे खडकवासल्यात, हत्येचं धक्कादायक कारण समोर

70 हजार कोटींची संपत्ती 

आर्यमन बिर्लाचा 2018 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकले नाही. त्यानंतर 2019 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि व्यवसायात उतरला. आर्यमनची एकूण संपत्ती किती आहे याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती 70 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमएस धोनीकडे 1 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर विराट कोहली 1050 कोटींचा आणि सचिन 1250 कोटींचा मालक आहे.