अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखलं व त्याला ताब्यात घेतलं. नारायण सिंह असं आरोपीचं नाव आहे. सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला व त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडलं. आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय आहे.

अधिक वाचा  पुणे अर्बन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कर्वेनगर – वारजे परिसरातील भगिनींसाठी मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्कचे मोफत प्रशिक्षण शिबीर