महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार, याकडे लागले आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय़.तसंच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युलाही ठरलाय. मात्र आता एक नवा तिढा महायुतीत उभा राहिलाय. आणि तो म्हणजे गृहमंत्रिपद…..एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय़. गृहमंत्रिपदाबाबत शिंदे गटानंही तशी उघड इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे महायुतीतल्या तिढ्याचं कारण समोर आल्याचं दिसतंय.

गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचं बोललं जातंय. नेमक्या त्यांच्या काय अटी आहेत ते पाहूया.

शिंदे गृहमंत्रिपदावर अडले? –

1. एकनाथ शिंदेंना गृहमंत्रिपद हवं

2. गृहमंत्रिपद दिलं तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार?

3. गृहमंत्रिपद न दिल्यास सरकारमध्ये सहभाग नाही?

अधिक वाचा  पुण्यात कोणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? कार्यकर्त्यांना यांच्या पुनर्नियुक्तीची अपेक्षा? ‘या’ आमदारांचाही मुंबईत तळ

4. फडणवीसही गृहमंत्रिपदासाठी आग्रही

5. गृहमंत्रिपदामुळेच शपथविधी लांबला?

महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतरही सत्तेच्या वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्यास सांगितले होते.

आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगितले जातंय. त्यामुळे महायुतीतील एकोपा कायम राहावा म्हणून एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं, यासाठी भाजप आग्रही आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहणार का आणि त्याहीपेक्षा भाजप गृहमंत्रालय शिंदेंना देणार का ? हा खरा प्रश्न आहे…..मात्र हा तिढा सुटल्याशिवाय शपथविधीचं अडलेलं घोडं पुढं जाणार नाही.

अधिक वाचा  जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू प्लेइंग 11 मध्ये स्थान नाही 22 व्या वर्षी निवृत्त; संपत्ती मात्र सर्वाधिक 70 हजार कोटी

महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार, याकडे लागले आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय़.तसंच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युलाही ठरलाय. मात्र आता एक नवा तिढा महायुतीत उभा राहिलाय. आणि तो म्हणजे गृहमंत्रिपद…..एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय़. गृहमंत्रिपदाबाबत शिंदे गटानंही तशी उघड इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे महायुतीतल्या तिढ्याचं कारण समोर आल्याचं दिसतंय.

गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचं बोललं जातंय. नेमक्या त्यांच्या काय अटी आहेत ते पाहूया.

शिंदे गृहमंत्रिपदावर अडले? –

1. एकनाथ शिंदेंना गृहमंत्रिपद हवं

2. गृहमंत्रिपद दिलं तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार?

3. गृहमंत्रिपद न दिल्यास सरकारमध्ये सहभाग नाही?

अधिक वाचा  महायुती सरकार 2.0 नवा नियम! शिवसेनेच्या ३ मंत्र्यांना मिळणार डच्चू?, कोण आहेत हे मंत्री?