भाजपने राज्यात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळवले आहे. बहुमताच्या या सरकारपुढे अनेक प्रशासकीय आर्थिक व सामाजिक आव्हानांना सामोर जावे लागणार आहे. बहुमतासाठी केवळ १२ जागा कमी पडलेल्या भाजप, पुढच्या वेळी शतप्रतिशतचा अजेंडा राबण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या कसलेल्या मंत्र्यांशी दोनहात करण्याची ताकत ठेवणारे, भाजपमध्ये काही मोजके चेहरे आहे. अनूभवी, उत्तम प्रशासक तसेच भाजपचा अजेंडा खालपर्यंत पोहोचवणारे हे तगडे पाच चेहरे यावेळच्या मंत्रीमंडळात कायम असण्याची दाट शक्यता आहे.

सुधीर मुनगंटीवार

विदर्भात रेकॉर्ड ब्रेक सातव्यांदा निवडूण आलेले मुनगंटीवार हे पक्षाचा महत्वाचा चेहरा आहे. २०१४ मध्ये अर्थमंत्रीपदाची धुरा त्यांनी सक्षमपणे हाताळली. यावेळी वने, मस्तव्यवसाय, सांस्कृतिक कार्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. कल्पक योजना आखणे, प्रशासकीय यंत्रणेकडून त्या राबवून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या कल्पकतेने त्यांनी वनविभागाचा चेहरामोहरा बदलून टाकला. फडणवीस यांच्यानंतर राज्याच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची खडानखडा माहिती असणाऱ्यांमध्ये सुधीर मुनंगटीवार यांचे नाव येते. दोन वर्षात विस्कळीत झालेली प्रशासकीय यंत्रणा रुळावर आणणे, तसेच सरकारचा अजेंडा खालपर्यंत झिरपण्यात मुनगंटीवार यांचा अनूभव कामी येईल.

अधिक वाचा  काँग्रेसचे वातावरण असूनही भाजपने महाराष्ट्र-हरयाणामध्ये षड्यंत्रानेच विजयी झाली; अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

कामगिरी- वर्धा व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री म्हणून पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.

चंद्रकांत पाटील

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अत्यंत चांगले संबध असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी महसूल, सार्वजनिक बांधकामसारख्या अंत्यत महत्वाच्या खात्याचा कारभार हाताळला आहे. उत्तम संघटक म्हणून त्यांची भाजपमध्ये ओळख आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. भाजपच्या महत्वाच्या चेहऱ्यापैकी एक चेहरा असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा अनूभव या सरकारमध्ये कामी येईल.

कामगिरी- कोथरुड मतदारसंघातून १ लाख १२ हजार मताधिक्याने भाजपचा हॅट्रिक विजय

चंद्रशेखर बावनकुळे

प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वात भाजपचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. मात्र सहा महिन्यात भाजपसह महायुतीने दणदणीत यश मिळवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी विधानसभा निवडणूकांचे नियोजन केले. २०१९ मध्ये आमदारकीचे तिकीट कापलेल्या बावनकुळे यांनी राजकारणात जबरदस्त कमबॅक केला आहे. २०१४ मध्ये उर्जामंत्रीपदाचा कारभार सांभाळला, अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारा मंत्री म्हणून त्यांनी नाव कमावले. सरकारला गती देण्यासाठी बावनकुळे यांचा चेहरा महत्वाचा असणार आहे.

अधिक वाचा  सत्तारोहणापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सिद्धिविनायक- मुंबादेवीचं दर्शन घेतलं, आता सागर बंगल्यावर गाई मागवल्या

कामगिरी – विदर्भात आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी.

गिरिश महाजन

महायुती सरकारचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांनी ओळख मिळवली आहे. सुरुवातीला काहीसे लो प्रोफाईल असलेले गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये महत्वाचे स्थान मिळवले. मराठा आंदोलनापासून सर्वच आंदोलनात यशस्वीपणे मध्यस्थी गिरीश महाजन यांनी केली आहे. याशिवाय वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास सारखी महत्वाचे विभाग महाजन यांनी हाताळले आहे. यावेळी देखील महायुतीमध्ये तसेच सरकारपुढे निर्माण होणारी संकटे हाताळण्यासाठी महाजनांचा अनूभव कामी येईल.

कामगिरी – उत्तर महाराष्ट्रात भाजपची सरशी

राधाकृष्ण विखे पाटील

विरोधी पक्ष नेतेपदी असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना थेट महसूलमंत्री पद देवून भाजप नेतृत्वाने त्यांचा सन्मान राखला. शांत,संयमी असलेल्या विखे पाटील आता भाजपशी एकरुप झाले आहे. मराठा चेहरा तसेच प्रशासनाचा त्यांचा उत्तम अनूभव सरकारसाठी महत्वाचा असेल. लोकसभेत सपाटून मार खालेल्या विखे पाटील यांनी अहिल्यानगरमध्ये भाजपचा चांगले यश मिळवून दिले आहे.

अधिक वाचा  आमिर खानच्या 9 घरांवर चालणार बुलडोझर, घरं तोडण्याचं नेमकं कारण काय?

कामगिरी- बाळासाहेब थोरात यांना नवव्यांदा विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात महत्वाची भूमिका