खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असतानाही पारंपरिक विरोधक भाजपमध्ये सुरू झालेल्या बंडाळी आणि महायुतीतून मनसेने घेतलेली फारकत या सर्व पार्श्वभूमी वरती खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रबळ इच्छुक ज्येष्ठ नेते काका चव्हाण आणि उमेदवारी मिळालेले तरुण नेतृत्व सचिन दोडके यांचे झालेले दातृत्वाचे पोक्त मनोमिलन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आराखडे बदलतील की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. खडकवासला मतदारसंघात युवा नेतृत्व सचिन दोडके यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन सलग दोनदा संधी दिल्यानंतर सचिन दोडके यांनी जेष्ठ नेते वडीलधारी काका चव्हाण यांच्याकडे हीच योग्य वेळ आहे आपला वचपा काढण्याची अशी साथ घातली आणि पोक्त काका चव्हाण यांनी हातात हात घालून प्रचाराची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली असल्याने खडकवासला विधानसभा मतदारसंघाची गणिते तुतारीच्या बाजूने जुळू लागल्याचं चित्र निर्माण झाले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांची ‘मताधिक्या’ची हवा या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराने पूर्ण लयास गेली आहे. त्यातच विद्यमान आमदाराने फक्त ‘इव्हेंट बेस’ प्रचार फॉर्मुला वापरला असल्याने सलग चौथ्यांदा निष्क्रिय नेतृत्व नागरिकांना आता टोचण्यास सुरुवात झाली असल्याने खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये हमखास तुतारीचा विजय होणार असल्याचे मत एकत्र प्रचार करताना काका चव्हाण यांनी व्यक्त केले तर काका चव्हाण हा दातृत्वाचा वटवृक्ष असून त्यांच्या उंबऱ्यावरून कोणीही निराश गेला नाही हे संपूर्ण पुणे शहरात एक मूर्तीमंत उदाहरण आहे. अशी मोठ्या दिलाची माणसे जर आदरणीय शरद पवारांच्या विचाराबरोबर राहिली तर या मतदारसंघात तुतारीचा हमखास विजय होणारच असा दृढ विश्वास खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन दोडके यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला.
खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 5 लाख 45 हजार 843 पैकी 1,84,395 मतदार संख्या वारजे माळवाडी बावधन कोंढवे धावडे शिवणे सिंहगड ग्रामीण परिसरात आहे. तर सर्वाधिक 2,06,468 मतदार सिंहगड रोड वडगाव, धायरी, नऱ्हे या भागात काका चव्हाण यांनी प्रचारात घेतलेली आघाडी लक्षात घेता खडकवासला विधानसभा मतदारसंघाची गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार असलेल्या भीमराव तापकीर यांच्या कात्रज धनकवडी भागातील नागरिकांनी तीस वर्षापासून या नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या परंतु पदरी निराशा पडल्यामुळे या भागातील 1,12,160 मतदार संख्या नागरिकांनाही वारजे माळवाडी प्रमाणे स्वच्छ सुंदर आणि बदलतं शहरीकरण याची उत्सुकता असल्याने या भागातूनही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सचिन दोडके यांना प्रचंड मते मिळतील अशी अपेक्षा काका चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर या मतदारसंघात काही निवडक निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जीवावर खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची उत्तम बांधणी केली असून खडकवासला मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांच्या संयुक्त प्रयत्नाने खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हमखास यश मिळणार असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या महायुतीमुळे एकत्र चहापान सुरू असल्या तरी खरा धोका प्रत्येकाच्या मनात आहे की महापालिका निवडणुकावेळी काय? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात विरोधकांचा प्रचार रखडला आहे. दिवंगत आमदारांच्या पत्नीचा झालेला पराभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिव्हारी लागला असून स्वतः कृष्णकुंजने या मतदारसंघांमध्ये लक्ष घातले असून आता नव्या गणितानुसार बदलाचे संकेत अंगीकृत करून महाविकास आघाडीने प्रचाराची दिशा बदलली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सचिन दोडके यांनी दिलेली तगडी लढत लक्षात घेता या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाविकास आघाडी भक्कम पाठीशी असल्यामुळे यंदा खडकवासल्यामध्ये गुलाल आपलाच आहे! आपल्या सचिनला आमदार करायचेय! हा दृढसंकल्प ज्येष्ठ नेते काका चव्हाण यांच्या नेतृत्वाने धायरीश्वराच्या मंदिरात करण्यात आला आहे.