ओबीसी आंदोलक श्री लक्ष्मण हाके यांनी स्वतःला PHD असल्याचे व प्राध्यापक असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदयपदी स्वतःची 26 जून 2021 रोजी नियुक्ती करुन लाभाच्या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून आज पर्यंत लाखो रुपये उकळले आहेत. वास्तविक लक्ष्मण हाके यांनी कुठल्याही कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेले नाही ना त्यांच्याकडे PHD चीही पदवी आहे. असे असताना देखील त्यांनी राज्य सरकार व समाजासमोर स्वतःला अनेक व्यासपीठावरून व समाज माध्यमातुन स्वतःला प्राध्यापक म्हणवून घेतले व महाराष्ट्र शासन व समाजाची फसवणुक करत आर्थिक, सामाजिक व राजकिय लाभ घेतला.
लक्ष्मण हाके यांनी प्राध्यापक व PHD असल्याचे कोणतेही कागदपत्र व पुरावे राज्य शासनाकडे आजवर जमा केलेले नाहीत. या व्यतिरिक्त सन २०२४ रोजी माढा लोकसभा निवडणुक लढवताना स्वतः व्यवसायिक असल्याचे आणि MA पदवीधर असल्याचं शपथपत्र लक्ष्मण हाके याने निवडणुक आयोगाला दिले आहे. महाराष्ट्र शासनाची व निवडणुक आयोगाची जी फसवणुक केली आहे ही अत्यंत गंभीर बाब असून सदर प्रकरणी आपण तात्काळ गुन्हा नोंदवून श्री लक्ष्मण हाके यास त्वरित अटक करावी ही मागणी अँड अमोल गव्हाणे यांची लेखी तक्रारीद्वारे भोसरी पोलिसांना केली आहे.
लक्ष्मण हाके यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता अंतर्गत खालील प्रमाणे भारतीय न्याय संहिता (BNS Sec 318 (4), भारतीय न्याय संहिता (BNS Sec 336), भारतीय न्याय संहिता (BNS Sec 335 A), भारतीय न्याय संहिता (BNS Sec 336 A), भारतीय न्याय संहिता (BNS Sec 196) गुन्हा दाखल करावा असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले आहे.