विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. अनेक मुद्यांभोवती ही निवडणूक फिरत आहे. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकसभेत मराठा फॅक्टरने सत्ताधाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पण या निवडणुकीत मोठा उलटफेर करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी काही जागांवर उमेदवार देण्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी या जागांवर इच्छुक उमेदवारांनीच त्यांच्यातून एक उमेदवार देण्याचे आवाहन केले होते. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत खास बैठक बोलवली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ते किती मतदारसंघात उमेदवार देणार याविषयीचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला. आता याविषयीचा खुलासा ते 3 नोव्हेंबर रोजी करणार आहेत.

आता त्यांना संपवायचं

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत मोठा ट्वीस्ट, शिंदे गट-भाजपमध्ये गृहमंत्रिपद विभागले जाणार?

आम्हाला संपवायला निघालेल्यांना आम्हाला संपवायचं आहे. त्यांचं राजकीय करिअर संपवायचं आहे. लोकशाही प्रमाणे आम्ही हा उचलेला विडा आहे. तो पण आम्ही कडेला न्यायचं ठरवलं आहे. राज्य आणि राज्याच्या बाहेरचे लोक जे सुंदर स्वप्न पाहात होते ते आज साकार झालयं. दलित, मुस्लिम मराठा एकत्र आले आहेत. या सर्वांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. समीकरण झाल्याशिवाय मनातून तुम्ही बदल करू शकता पण परिवर्तन करू शकत नाही. बदल होत असतो. पण परिवर्तन होत नसतं. परिवर्तनासाठी आजचा दिवस चांगला आहे. दलित, मुस्लिम मराठा एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही असं सांगत होतो, ते आज झालं. आमचं समीकरण पक्कं झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदींनी संसद भवनात कलाकारांसोबत पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’

७५ वर्षात जे समीकरण जुळणार नव्हतं ते आज एकमतानं नाही, दलित-मुस्लिम-मराठा एकत्र

आधी आमच्यासाठी कर्तव्य होतं जो समोर अन्यायासाठी आक्रोश करतोय त्यांच्या वेदना आणि आक्रोश जाणून घेणं हे आमचं काम होतं. ७५ वर्षात जे समीकरण जुळणार नव्हतं ते आज एकमतानं नाही, बहुमताने पक्कं झालं आहे. आम्ही तिघं आज एकत्र आलोय. आमच्या चर्चेतून सर्व प्रश्न झाले. शेतकरी, ओबीसी, मराठा, मुस्लिम, महिलांचे सर्व प्रश्नावर आम्ही चर्चा केली. धर्मावरही चर्चा झाली. मी हिंदू आहे. त्यांचा इस्लाम आहे. यांचा बौद्ध धर्म आहे. आपण एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही. , असे आवाहन त्यांनी केले.

अधिक वाचा  शपथविधीसाठी मैदानाची पाहणी करायला एकाच पक्षाचे नेते कसे गेले?, देवेंद्र फडणवीस यांना मेसेज

आता निर्णय 3 नोव्हेंबरला

सगळ्या जाती धर्मासाठी दोन दिवस गॅप ठेवला आहे. लिंगायत, बंजारा, ओबीसी, धनगर समाजाचे धर्मगुरू आहेत. महानुभवपंथांचे धर्मगुरू आहेत. वारकरी संप्रदायाचे आहेत सर्व येणार आहेत. त्या सर्वांनी यावं म्हणून आम्ही तीन चार दिवसाचा गॅप ठेवला आहे. आज आमचं ओरिजिनल शिक्कामोर्तब झालंय. मराठा, दलित मुस्लिम एकत्र आला. जागा किती लढायच्या याची घोषणा ३ तारखेला करणार आहे. उमेदवार कोण हे जाहीर करणार आहोत. आम्ही उमेदवाराबाबत काही लावून धरणार नाही. यांनी आम्हाला खूप त्रास दिला. आम्हाला त्रास दिला. आमच्या लोकांना त्रास दिला. ज्यांनी सत्तेवर बसवलं. त्यांच्या डोक्यात पोटात गोळ्या घातल्या, असा आरोप त्यांनी केला.