पुणे ता. ३० : कोथरूड मधील गुजरात कॉलनी येथे बाल प्रतिष्ठान च्या सभासदांनी दिवाळीनिमित्त ‘लोहगड किल्ला’ची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. यासाठी हर्ष मेहता, आयुष मांढरे, मोरया सोनेकर, ओम मांढरे, युवराज खत्री, नम्र मारु, श्री मोहोळ, प्रथमेश पेठे आदी सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. गुजरात कॉलनीतील वर्धमान प्रेस चौक येथे साकारलेला किल्ला बघण्यासाठी कोथरूड परिसरामधील लहान मुले व अबाल वृद्ध नागरिक गर्दी करत आहेत.

यावेळी बोलताना प्रीतम मेहता म्हणाले बाल प्रतिष्ठानचे हे दहावे वर्ष असून गेल्या वर्षी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आपल्या पूर्वजांनी अतिशय परिश्रमाने जपलेल्या गडकिल्ल्यांची माहिती या निमित्ताने नव्या पिढीला मिळत आहे. गडकिल्ले महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष आहेत. त्यांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यामुळे प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांना सर्वांनी आवर्जून भेट दिली पाहिजे.

अधिक वाचा  ठरलं! भाजप 21, शिवसेना 12 राष्ट्रवादीला ‘सॉफ्ट कॉर्नर’मुळे 11 खाती; यांचा समावेश शक्य? यांच्याबाबत अनिश्चितताचं