छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी या दिवाळीतील पहिला दिवा अर्पण करून दिवाळीची सुरुवात करण्याचा स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान येथे दरवर्षी दिपोस्तवाचे संकल्प करून तो पूर्णत्वास आणला व या दिवाळीची सुरुवात केली. कोथरुड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची परिसरातील साफसफाई करून तेथे रोजी सायं. ०७. ०० वाजता दीपोत्सवाचे आयोजन केले होते. फुलाची सजावट, रांगोळी काढून अन् पणत्यांची आरास केली.
या उत्सवाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पूजा करून व श्रीफळ वाढवून करण्यात आली. त्यानंतर शंखनाद करून जिजाऊ गर्जना , शिवगर्जना व शंभू गर्जना करण्यात आली.यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला यंदा 351 वर्ष पूर्ण झाल्या निम्मित 351 पणत्यांची आरास करून अनोखा दिपोस्तव साजरा करून फटाक्याची आतिषबाजी केली.
तसेच प्रमुख उपस्थिती विजय खळदकर , केदार मारणे , रेश्मा बराटे , अमृत मारणे,संतोष बराटे ,संतोष वरक,सागर फाटक ,अशोक कदम,मयूर बनकर,दादा आठवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्याच बरोबर स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे तृप्ती कडू , रुपाली हाळे, मिताली गोरे , प्रमोद वारशेट्टी, गणेश पाटील,स्वप्नील बराटे,स्वराज कळंबटें,आयुष गायकवाड,सार्थक गायकवाड,सर्वेश पगारे, वेदांत गायकवाड, रिदांश कडू,बाबासाहेब तांबे,ऋषिकेश जगताप, रोहीत कळंबटें,अभिजित शिंदे, ऋषिकेश साळुंखे,रमेश ढोकळे, भारत रेनुसे, निखील चोरगे, सुनील गोरे, मंगेश नवघणे, अथर्व भरम, विजय औजी, ओंकार कंधारे शिलेदार उपस्थित होते.
*या दीपोत्सवाच्या वेळी प्रतिष्ठान चे अविनाश चोरगे यांनी स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान चे कार्य व संस्था स्थापनेमागचा उद्दिष्ट स्पष्ट केले* .आपल्या भावी पिढीला इतिहास व गड किल्ले हे शाश्वत स्वरूपात बघता यावेत व छत्रपती श्री शिवाजी महाराज व शंभू महाराज यांचे संस्कार आपल्या भावी पिढीत कसे रुजवता येतील याबद्दल थोडक्यात आपले मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराज यांच्या जयघोषात व स्मारकास वंदन करून दीपोत्सवाची सांगता करण्यात आली.