एका नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार, 100 जण ताब्यात!

 मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात आपल्या पतीसोबत बाहेरगावी फिरायला गेलेल्या एका नवविवाहितेवर पाच जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.गुऱ्हा तहसीलमधील सहलीच्या ठिकाणी सोमवारी सामूहिक बलात्कार झाला. त्या महिलेचा नुकताच विवाह झाला आहे. ती व तिचे पती 19-20 वयोगटातील असून ते अजूनही महाविद्यालयात शिकत आहेत, असे रीवा मुख्यालयाचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) हिमाली पाठक यांनी वृत्तसंस्थेला दूरध्वनीवरून सांगितले.

सामूहिक बलात्कार प्रकरण अतिशय संवेदनशील असून पीडितेची ओळख उघड होणार नाही याची खात्री करण्यासाठी पोलिस काळजीपूर्वक प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे, असे त्यांनी सांगितले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाच जणांपैकी एकाच्या हातावर छातीवर टॅटू आहेत, असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. सोमवारी ही घटना घडल्यानंतर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास या जोडप्याने गुऱ्हाळ पोलिस स्टेशन गाठले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे कर्मचारी व मी घटनास्थळी पोहोचलो. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली व त्याचदिवशी सायंकाळी सात वाजता एफआयआर नोंदवण्यात आला, असे हिमाली पाठक यांनी सांगितले.

पीडित महिलेने दिलेल्या बयाणाचा हवाला देत पाठक यांनी सांगितले की, गुऱ्हा औद्योगिक क्षेत्रातील एका प्रसिद्ध मंदिरापासून सुमारे २ कि. मी. अंतरावर असलेल्या कारंज्याजवळ तिचे तिच्या पतीसोबत भांडण झाले. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या कारंज्याजवळ पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला, असे पीडित महिलेने आपल्या निवेदनात सांगितले. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आम्ही १०० हून अधिक लोकांना व संशयितांना ताब्यात घेतले आहे. आमची चौकशी सुरू आहे. पाच अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेनुसार सामूहिक बलात्कार व इतर आरोपांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img