काय झाडी, काय डोंगार.. काय पैशाचा पाऊस आणि काय सोन्याची बरसात… .!

नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यश

 राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने ठिकठिकाणी नाकेबंदी असून लहान मोठ्या वाहनांची तपासणी केली जात असतानाच पुण्यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना नाकाबंदीदरम्यानत तब्बल 138 कोटींचं सोनं सापडलं आहे. आज सकाळी केलेल्या कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं जपत् करण्यात आलं आहे.

घडलं काय?

पुण्यातील सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच 02 ईआर 8112 या कंटेनरला तपासणीसाठी थांबवलं. तपासणीदरम्यान या पांढऱ्या रंगाच्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत 138 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. नियमित नाकाबंदीदरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पोलिसांनी या सोन्याच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता चालकाकडे आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडे रितसर कागदपत्रं होती. हे एवढं सोन डिलिव्हरी ट्रान्सपोर्टचे होते अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. या सोन्याच्या वाहतुकीचा कायदेशीर परवाना संबंधित वाहन चालकाकडे असल्याचं स्पष्ट झाल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

हिंगोलीत सापडली कॅश

हिंगोलीत नाकाबंदीदरम्यान एक कोटी रुपयांची रक्कम स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. विधानसभा निवडणूक अनुषंगाने हिंगोलीत जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून चेक पोस्टवर वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान 2 कारची तपासणी केली असता एका कारमध्ये एक कोटी 23 लाख रुपये सापडले तर दुसऱ्या कारमध्ये 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. नेमकी ही रक्कम कोणाची आहे कशासाठी आणि कुठे जात होती. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापडली पाच कोटींची कॅश

21 ऑक्टोबर रोजी पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर जवळपास 5 कोटी रुपयांची रोख रक्कम तपास यंत्रणांच्या हाती लागली होती. कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही मोठी रोख रक्कम पकडण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. रात्री ही रोख रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर ही रक्कम मोजायचं काम पहाटे चार वाजेपर्यंत सुरु होतं. हे पैसे कोणाच्या मालकीचे आहेत? कुठे नेले जात होते? कोणाकडे पाठवले जात होते याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img