पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान

पिंपरी : मोबाइल शॉपीला आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे दोन वाजताच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास पिंपरीतील शगुन चौकात असलेल्या प्रीतम मोबाइल या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाली.त्यानुसार अग्निशामक मुख्यालयातून आगीचा बंब घटनास्थळी दाखल झाला.

दुकानाचे शटर उचकटून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामक दलाचे चंद्रशेखर घुले, फायरमन सारंग मंगरुळकर, रुपेश जाधव, चालक केतन औसरमल, ट्रेनी फायरमन स्वप्नील उचाले, राज शेडगे, किरण राठोड, अनिकेत गोडसे, कौस्तुभ जाधव, आविष्कार लावंड, रतन जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img