कोणाला संधी, कोणाला डच्चू?; मनसे, शिंदे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी आज होणार जाहीर?

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यातच काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी झाली. या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर काही उमेदवारांमध्ये आनंदाचे तर काहींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपच्या यादीनंतर आता लवकरच सर्वच पक्षांकडून त्यांच्या पहिल्या उमेदवारींची यादी जाहीर करणार आहेत.

राज ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अॅक्शन मोडवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचे निवास्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी बैठकांवर बैठका पार पडत आहेत. आज सकाळी राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मनसेच्या उमेदवार निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे मनसेच्या विधानसभा लढणाऱ्या उमेदवारांची यादीच आजच जाहीर होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी
विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मनसेने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात मुंबईसह महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर

2. पंढरपूर – दिलीप धोत्रे

3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे

4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे

5. चंद्रपूर – मनदीप रोडे

6. राजुरा – सचिन भोयर

7. वणी – राजू उंबरकर

शिंदे गटाची यादीही तयार, ३० ते ४० जणांचा समावेश
दरम्यान भाजपपाठोपाठ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली विधानसभेची यादी तयार करण्यात आली आहे. आज या यादीवर शेवटचा विचारविनिमय केला जाणार आहे. त्यानंतरच शिंदे गटाकडून साधारण ३० ते ४० जणांची यादी प्रदर्शित केली जाईल.

उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब
तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादीही आजच जाहीर केली जाईल, असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहेत. आज या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img