‘सांगली पॅटर्न’नुसार ठाकरेंचे पाऊल! मित्रपक्षांच्याच बालेकिल्ल्यावर ठाकरे गटाचा दावा; नाराजीत वाढ

सांगोला मतदारसंघ हा आमचा परंपरागत असून, या जागेवर शिवसेना (ठाकरे) लढणार असल्याचे आज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज मशाल हाती घेतानाच ही घोषणा झाल्याने आघाडीमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे.शेकापच्या या हक्काच्या मतदारसंघात शिवसेनेने घेतलेल्या या पवित्र्यामुळे सांगोल्याचे राजकारण आता सांगलीच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गणपतराव देशमुख यांनी दोन निवडणूक वगळता या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी आघाडीच्या जागावाटपात ही जागा शेकापसाठी सोडली जायची. मात्र आता आघाडीमध्ये शिवसेना (ठाकरे) दाखल झाल्याने नवा पेच निर्माण झालेला आहे. शेकापकडून मतदारसंघात आघाडीकडून प्रचार सुरू केलला असताना आता शिवसेनेच्या या नव्या पवित्र्यामुळे आघाडीच्या एकजुटीला धक्का लागणार आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी नुकताच पक्ष आणि पदाचा राजीनामा दिला. यानंतर लगोलग त्यांनी आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. आज साळुंखे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश करत मशाल हातात घेताच सांगोल्याच्या राजकारणास नवे वळण लागले. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर पक्षाकडून आघाडीच्या वतीने सांगोला मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे सांगोल्यात नवा वाद तयार झाला आहे.

सांगोला मतदारसंघ शिवसेना आणि शेकाप हे दोन्ही पक्ष परंपरागत लढत असल्याने आता ते दोघेही एकाच आघाडीत आल्याने हा संघर्ष तयार झाला आहे. यात आता शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केल्याने सांगोल्याचे राजकारण लोकसभेवेळी सांगलीत जे घडले तेच सांगोल्यात घडण्याची शक्यता दिसत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सांगली मतदारसंघ परंपरागतरित्या कॉंग्रेसचा बालेकिल्ला असतानाही जागा वाटपात हा मतदारसंघ शिवेसेनेकडे (ठाकरे) गेल्याने त्या निवडणुकीतही शिवसेना आणि कॉंग्रेसचा बंडखोर उमेदवार रिंगणात दाखल झाले होते. अखेरीस या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होत बंडखोर विजयी झाले. आघाडीअंतर्गत याच संघर्षाचा नवा अंक आता सांगोल्यात दिसण्याची शक्यता आहे.

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img