आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल;

पुणे: विधानपरिषदेवर संधी दिली नाही म्हणून राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अचानक त्यांनी आपली राजीनाम्याची तलवार म्यान केली.पवार यांनी पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक नियोजनासाठी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मानकर यांच्या समर्थनासाठी पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे जाहीर केले होते. कोणाचाही राजीनामा मंजूर करणार नाही असे पवार यांनी सांगितले असल्याची माहिती मानकर यांनी दिली. आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला. त्यामुळे राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार आहे असे ते म्हणाले.

मानकर यांना विधानपरिषदेवर घ्यावे अशी मागणी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली होती. ती मान्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा सत्र सुरू केले होते. स्वत: मानकर यांनीही दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपण राजीनामा देणार आहे, प्रामाणिकपणे काम करूनही पक्ष विचारत नसेल तर दुसरा काही पर्याय नाही असे ते म्हणाले होते. मात्र आता त्यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर आपला निर्णय बदलला आहे.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img