१३ काेटी लाेक अत्यंत गरीब

वी दिल्ली : भारतात १२.९ काेटी लाेक अतिशय दारिद्र्यात जीवन जगत असून, या लाेकांची दरराेजची कमाई अवघी १८१ रुपयांपेक्षाही कमी आहे. मात्र, २०२१च्या तुलनेत दारिद्र्यात राहणाऱ्या लाेकांच्या संख्येत ३.८४ काेटींनी घट झाली आहे.जगातील गरिबी हटविण्यासाठी या दराने अनेक दशके लागू शकतात, असे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.

विकसनशील मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाठी गरिबीची मर्यादा ही दरराेज ५७६ रुपये दैनंदिन उत्पन्न एवढी आहे. १९९०च्या तुलनेत २०२४  जास्त भारतीय दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. २०३०पर्यंत जगातून गरिबी हटविण्याचे लक्ष्य साध्य हाेताना दिसत नाही, असे अहवालात म्हटले आहे.

गरिबीत राहणारे लाेक –
(आकडेवारी काेटीमध्ये)
२०१७ १८.१
२०१८ १५.१७
२०१९ १७.६
२०२० २०.५५
२०२१ १६.७४
२०२४ १२.९

अत्यंत गरीब किती?
– जगातील ७० काेटी जनता दरराेज ५७६ रुपयांपेक्षा कमी कमाई करत आहे.
– लाेकसंख्या वाढीमुळे १९९०च्या तुलनेत सध्याच्या आकडेवारीत फार फरक आलेला नाही.
– जगातील ८.५ टक्के म्हणजे, सुमारे ७० काेटी लाेकांचे उत्पन्न १८१ रुपयांपेक्षाही कमी आहे.
– ७.३ टक्के लाेक वर्ष २०३०मध्ये अत्यंत गरिबीत राहत असतील.
– आफ्रिकेतील अनेक देशांसह विकसनशील देशांमध्ये अत्यंत दारिद्र्यात वाढ हाेणार आहे.

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img