आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार; यादी तयार, आज पार पडणार शपथविधी

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे आजपासूनच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांपैकी ७ जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी आजच पार पडणार आहे. सध्या विधीमंडळात या शपथविधीची तयारी सुरु करण्यात आली आहे.

राज्यपालांकडून नावांना मजुरी
राज्यपाल नियुक्ती आमदारांचा शपथविधी आज दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडणार आहे. विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. सध्या विधीमंडळात शपथविधीची तयारी सुरू आहे. राज्यपाल नियुक्ती विधानपरिषद आमदारकीसाठी 12 लोकांची नियुक्ती गेल्या 5 वर्षापासून रखडली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.

‘हे’ सात नेते घेणार शपथ
यानुसार भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. आज हे सातही आमदार शपथ घेणार आहेत.

आज दुपारी 12 वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे. विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधान परिषद सदस्यांना शपथ देतील.

ठाकरे गटाचा आक्षेप
राज्यपाल नियुक्त सात आमदारांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याविरुद्ध ठाकरे गटाकडून सकाळी साडेदहा वाजता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने अॅडव्होकेट सिद्धार्थ मेहता सकाळी साडेदहा वाजता याचिका दाखल करणार आहेत.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img